Ashok Uike Politics: आदिवासी विकास मंत्री अशोक उईके संतापले, 'त्या' नेत्यांना दिला इशारा...

Ashok Uike; Tribal Development Minister Ashok Uike got angry and made serious allegations against tribal organizations-आदिवासी विद्यार्थ्यांच्या बिऱ्हाड मोर्चेकर्‍यांना मंत्री अशोक उईके यांनी स्पष्टच सुनावले
Ashok uike
Ashok uikeSarkarnama
Published on
Updated on

Ashok Uike News: राज्यातील आदिवासी आश्रम शाळांच्या नोकर भरतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रश्नावर गेल्यावर्षी आदिवासी विकास भवनला घेराव घालण्यात आला होता. आता याच प्रश्नावर विद्यार्थ्यांनी सोमवारी बिऱ्हाड मोर्चा काढला.

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके सोमवारी नाशिकच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांना आदिवासी विद्यार्थ्यांच्या विऱ्हाड मोर्चाचे प्रश्न आणि समस्यांना सामोरे जावे लागले. यातील बहुतांशी समस्या यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीत चर्चेला आल्या होत्या. मात्र त्यावर कार्यवाही होऊ शकली नाही.

या पार्श्वभूमीवर आदिवासी विद्यार्थ्यांनी विराट मोर्चा काढत आश्रम शाळांचे खाजगीकरण आणि आश्रम शाळांतील शिक्षकांच्या भरतीचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. या प्रश्नावर थेट कार्यवाही आणि निर्णय द्यावा अशी त्यांची मागणी होती. त्याशिवाय अन्य कोणताही तोडगा त्यांना मान्य नसल्याने बिऱ्हाड मोर्चा चिघळला. त्यामुळे आदिवासी विकास मंत्री संतापले आहेत.

Ashok uike
Dada Bhuse Politics: शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षणमंत्र्यांना घ्यावी लागली हजेरी...मात्र विद्यार्थ्यांची नव्हे तर चक्क शिक्षकांचीच!

यासंदर्भात पोलिसांसह अन्य सर्व मध्यस्थीचे प्रयत्न अपयशी झाल्याने आदिवासी विकास मंत्री त्रस्त झाले होते. या विषयावर त्यांनी मोर्चेकर्‍यांना प्रारंभी सुचकारण्याचा प्रयत्न केला. यश न आल्याने त्यांनी मोर्चेकर्‍यांना थेट इशाराच दिला आहे.

आदिवासी कंत्राटी शिक्षकांची भरती करण्यावर शासन ठाम आहे मात्र यास आदिवासी संघटनेचा विरोध होत आहे जर कोणी या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते कदापिही सण केले जाणार नाही, असा इशाराच मंत्री उईके यांनी दिला.

आदिवासी विकास विभाग विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे काही अडचणी शासनांपुढे आहेत. त्याचा विद्यार्थ्यांनी आणि मोर्चेकर यांनी विचार केला पाहिजे. ही बाब न्यायप्रविष्ठ असल्याने त्यात विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. मात्र चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या गोष्टींना आदिवासी संघटनांनी पाठिंबा देऊ नये, असे सांगत मंत्री उईके यांनी मोर्चेकरी तसेच आदिवासी संघटना नाही स्पष्टच इशारा दिला आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत येत्या दोन-तीन दिवसात पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक होणार आहे. या बैठकीत काय चर्चा होते आणि कोणता निर्णय घेतला जातो याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आदिवासी विकास मंत्री यांनी संघटनांना थेट इशारा देत अंगावर घेतले आहे. हा वाद आता कोणत्या वळणावर पोहोचतो आणि काय राजकीय वळण मिळते याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com