

Nashik news updates : मालेगाव शहरात बनावट जन्म दाखल्यांचे सर्वात मोठे रॅकेट उघड झाले. याबाबत 711 जणांवर गुन्हे दाखल झाले. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हा आरोप केला होता.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गेले काही दिवस मालेगाव इथले जन्मदाखल्यांबाबत मोहीम उघडली होती. मालेगाव शहरात बांगलादेशी नागरिक राहतात असा दावाही त्यांनी केला होता. आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.
माजी खासदार सोमय्या यांना मालेगावचे (Malegaon) माजी आमदार आसिफ शेख यांनी थेट आव्हान दिले आहे. 'एसआयटी'चा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. केसांच्या आरोपपत्रांमध्ये कोणताही गंभीर आरोप नाही, असे शेख म्हणाले.
'एसआयटी'चा अहवाल येताच माजी खासदार सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात येईल. सोमय्या यांनी मालेगाव शहराची बदनामी करण्याची सुपारी घेतली आहे. सुपारी घेऊन मालेगाव शहराला बदनाम करणे हाच त्यांचा धंदा आहे, असा गंभीर आरोप माजी आमदार शेख यांनी केला.
सोमय्या यांनी सांगितले की, "मालेगाव शहरात 3977 बनावट जन्म दाखले देण्यात आले. यातील 2214 दाखले महापालिकेने परत घेतले. 946 जण दाखले घेऊन बेपत्ता झाले आहेत. यामध्ये वकिलांसह 125 एजंट आणि 35 सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे."
माजी आमदार शेख यांनी मात्र सोमय्या यांचा दावा खोडून काढला आहे. या संदर्भात शासनाने 'एसआयटी' स्थापन केली आहे. 'एसआयटी'कडून हजारो नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल येण्याची प्रतीक्षा सोमय्या यांनी केली पाहिजे.
हेतूपूर्वक हिंदू आणि मुस्लिम, असा वाद निर्माण करणे हे भाजप आणि सोमय्या यांचे षडयंत्र आहे. आगामी महापालिका निवडणुकीत मतदारांमध्ये विभाजन करणे हा त्यांचा हेतू आहे. केवळ त्यासाठीच सोमय्या यांना सुपारी देऊन मालेगाव शहर बदनाम करण्याचे काम दिले आहे.
मालेगाव शहरात भारतीय जनता पक्षाने कितीही प्रयत्न केले तरी ते यशस्वी होणार नाहीत. भाजपला शहरात 84 प्रभागांपैकी 25 ठिकाणी देखील उमेदवार मिळणार नाहीत. मालेगाव शहरातील नागरिक भाजपला धडा शिकवतील, दावा देखील शेख यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.