Sandeep Kotkar : मनसुब्यावर पाणी फिरलं, संदीप कोतकरांना न्यायालयापाठोपाठ कोतवाली पोलिसांचा दणका

Decision of the District Court on Sandeep Kotkar application to lift the Ahilyanagar district ban : अहिल्यानगर शहर मतदारसंघातून निवडणुकीच मनसुबा घेऊन शहरात दाखल होण्यासाठी प्रयत्न करत असलेले संदीप कोतकर यांचा जिल्हाबंदी शिथिल करण्याच्या अर्जावर न्यायालयाचा मोठा निर्णय.
Sandeep Kotkar
Sandeep KotkarSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहर मतदारसंघातून निवडणुकीचा मनसुबा घेऊन शहरात दाखल झालेले माजी महापौर संदीप कोतकर यांना झटका बसला आहे.

जिल्हा न्यायालयाने त्यांच्या जिल्हा बंदी शिथिलचा अर्ज फेटाळला आहे. तसंच शहरात दाखल होताच केलेले शक्तिप्रदर्शन देखील भोवलं आहे. त्यांच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

माजी महापौर संदीप कोतकर यंदाची विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी करत होते. त्यांचे बंधू सचिन कोतकर यांनी पत्रकार परिषद घेऊन बंधू संदीप निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. तसंच ते राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या संपर्कात असल्याचे संकेत दिले होते. यासाठी कोतकर परिवाराकडून निवडणुकीची तयारी सुरू होते. तसेच वेगवेगळ्या गुन्ह्यात संदीप कोतकर यांच्याविरोधात असलेल्या जिल्हा बंदीची अट शिथिल करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते.

Sandeep Kotkar
Sangamner News : थोरात-विखेंमधील वाद पेटला! संतप्त कार्यकर्त्यांकडून गाड्यांची तोडफोड, नेमकं प्रकरण काय?

केडगावमधील दुहेरी हत्याकांडात जिल्हाबंदीची अट शिथिल व्हावी, यासाठी संदीप कोतकर यांनी जिल्हा न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता. या अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. याचवेळी त्यांची शहरात दाखल होताना केडगावमध्ये शक्तिप्रदर्शन केले. केडगाव उपनगरात मेळावा घेतला. मिरवणुकीच्या दरम्यान, हत्याकांडातील पीडित कुटुंबाला धमकी देत, विनापरवाना मिरवणूक काढून सभा घेतली, ध्वनिक्षेपकाचा वापर केला या कारणावरून संदीप कोतकर, बंधू सचिन कोतकर यांच्यासर सुमारे 200 जणांविरुद्ध कोतवाली पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sandeep Kotkar
Shankarrao Gadakh : आता षडयंत्र, अटक होऊ शकते, महायुतीच्या मंत्रिपदाची ऑफर नाकारली; शिवसेना'UBT'चा आमदार गरजला

माजी महापौर संदीप कोतकर यांच्याविरोधात अशोक लांडे खून प्रकरणातही न्यायालया जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. यात देखील न्यायालयाने जिल्हा बंदी घातली होती. मात्र या प्रकरणात ते जामिनावर असलेल्या कोतकर यांनी ते स्वतः किंवा त्यांची पत्नी माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांना निवडणूक लढवण्यासाठी जिल्हाबंदी शिथिल करावी, अशा मागणीचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता. यात न्यायालयाने कोतकर यांची जिल्हाबंदी 20 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर 2024 या कालावधीसाठी शिथिल केली.

दरम्यान, केडगावमधील दुहेरी हत्याकांडात देखील जिल्हा बंदी शिथिल करावी, यासाठी कोतकर यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यात अर्जात निवडणुकीचे कारण दिलेले नव्हते. व्यवसाय आणि इतर कारणांसाठी जिल्हा बंदी उठवावी, अशी कारणं दिली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवादानंतर संदीप कोतकर यांचा अर्ज फेटाळला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com