Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेताना पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभव मोठं भाष्य केले. लोकसभा निवडणुकीत त्यांचा आणि सुजय विखे यांचा पराभव कशातून झाला, यावर भाष्य केले.
"फेक नॅरेटिव्हमुळे आमचा पराभव झाला. आता विरोधकांच्या जातीवाद आणि संविधानाच्या अफवांवर विश्वास न ठेवू नका", असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.
महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांच्या प्रचारासाठी सर्व नेते मैदानात उतरले आहेत. भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी बीड, अहिल्यानगरसह राज्यात प्रचार सभांचा धडका लावला. अहिल्यानगर जिल्ह्यात सभा घेताना त्यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने वापरलेल्या फेक नॅरेटिव्हवर हल्लाबोल चढवला.
पंकजा मुंडे यांनी म्हटले, "माझा आणि सुजय विखे यांचा पराभव फेक नॅरेटिव्हमधून झाला आहे. आता मात्र विरोधकांच्या जातीवादाच्या, संविधानाच्या अफवांवरील प्रचाराला बळी पडू नका. भाजप (BJP) महायुतीचे सरकार आणण्यासाठी एकत्र या". अहिल्यानगर जिल्ह्यात विखेंची ताकद मोठी आहे. पक्षासाठी ते सक्रिय असून, त्याचा फायदा करून घ्या, असाही सल्ला पंकजा मुंडे यांनी दिला.
पंकजा मुंडे म्हणाल्या, "देशात नरेंद्र मोदीचे सरकार असून महाराष्ट्रात देखील महायुतीचे सरकार आणायचे आहे. लाडकी बहीण योजना अशीच सुरू ठेवायची आहे. भाऊ एक वेळेस बहिणीला सोडत असतो. मात्र बहीण कधीही भावाला सोडत नसते. विरोधकांना चांगले सरकार चालवता येत नाही". अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी माझी आहे". लोकनेते गोपीनाथ मुंडे आमदार, खासदार बनवणारी फॅक्टरी होती. विरोधक संविधान आणि जातीयवादावर अफवा पसरवतात, या गोष्टीवर विश्वास न ठेवता विकासाच्या कामाला मतदान करा, असे आवाहन आमदार मुंडे यांनी केले.
माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी आतापासून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलो आहे. विधानसभेनंतर लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करणार आहे. महाविकास आघाडी स्वतःच्या फायद्यासाठी काम करते. शेतकरी हिताचे सरकार आणायचे आहे, असे सांगून निवडणुकीत कोणतीही उणिव राहणार नाही.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.