Priyanka Gandhi : भाषणाच्या सुरुवातीलाच प्रियांका गांधींनी मागितली महिलांची माफी, म्हणाल्या...

Maharashtra Assembly Election Priyanka Gandhi Rally in Kolhapur : पंतप्रधाना निराशजनक भाषणं देत आहेत. या मोठ्या लोकांच्याकडून आशा भाषणाच्या अपेक्षा नाही. त्यांची जी जबाबदारी आहे तेच त्यांनी बोलावं, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
Priyanka Gandhi
Priyanka Gandhi sarkarnama
Published on
Updated on

Priyanka Gandhi News: प्रियांका गांधी यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी कोल्हापूरमध्ये सभा झाली. या सभेत प्रियांका गांधी यांनी भाषण करताना मोदी सरकारवर जोरदार टीका केली. बाळासाहेबांचे नाव घेऊन दाखव, असे चॅलेंज करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही बाळाासाहेबांचे नाव घेतो पण तुम्ही त्यांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला, असे प्रत्युत्तर दिले. त्याआधी प्रियांका गांधी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातील महिलांची माफी मागितली.

प्रियांका गांधी म्हणाल्या, भगिनी खूप वेळ वाटत पाहत होत्या. मला वेळ झाला. मी माफी मागतो. कोल्हापूरची धरती महान आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची ही भूमी आहे . देशाच्या स्वातंत्र्यात आहुती देणाऱ्यांची ही भूमी आहे.मानवता आणि समतेची भूमी आहे. या भूमीत मला गर्व वाटतो. या मातीचा गुणधर्म निभावला पाहिजे. तो मजबूत ठेवला पाहिजे.

Priyanka Gandhi
Ajit Pawar : महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले...

मोदींची भाषणं निराशजनक

पंतप्रधाना निराशजनक भाषणं देत आहेत. या मोठ्या लोकांच्याकडून आशा भाषणाच्या अपेक्षा नाही. त्यांची जी जबाबदारी आहे तेच त्यांनी बोलावं. मोदीजी भाषण करतात बाळासाहेबांचे नाव घ्या असं सांगतात. ते बाळासाहेब ठाकरेंच नाव घेतात आणि त्यांच्यात मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांनी.

शेतकऱ्यांसाठी काय केलं?

दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? निवडणुकीच्या आधी महिलांसाठी लाडकी बहिण योजना आणली. महागाई इतकी केली की गरीब कमवून खाऊ शकत नाही. पण मोदी व्यासपीठावर येतात आणि लाडकी बहीण योजना जाहीर करतात .जनतेला उत्तर देण्याचं धाडस त्यांच्यात नाही, असा टोला देखील प्रियांका गांधींनी लगावला.

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला

प्रियांका गांधींनी कोल्हापूरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. सरकारकडून शेतकऱ्यांना मदत मिळत नाही.तरुणांना रोजगार मिळत नाही,महाराष्ट्रात अडीच लाख सरकारी जागा खाली आहेत. राज्यातल्या सर्व कंपन्या आणि योजना दुसऱ्या राज्यात नेऊन विकल्या जात आहेत

आठ लाख नोकऱ्या महाराष्ट्रातून बाहेर गेल्या. सहा हजार उद्योग बंद झाले सरकारकडे रोजगार बनवण्यासाठी कोणती योजना नाही. महाराष्ट्राला आलेले महत्त्वाचे उद्योग गुजरातला नेले, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

Priyanka Gandhi
Manoj Jarange Patil : आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना आडवे करा! मनोज जरांगे पाटील गरजले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com