Rahul Gandhi in Nagpur : राहुल गांधी यांच्या फोडणीची फडणवीसांच्या मतदारसंघात खमंग चर्चा !

Rahul Gandhi interacts with youth while making tarri poha: राहूल गांधी आज विदर्भात प्रचारसभा घेण्यासाठी आले होते, याप्रसंगी त्यांची काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथाला होते.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Nagpur West Assembly constituency : काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी आज सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी सर्व बडेजाव आणि सुरक्षा यंत्रणेला बाजूला ठेवून चक्क तर्री पोहे बनवले, त्याचा अस्वाद घेतला आणि येथे आलेल्या तरुणांसोबत गप्पासुद्धा मारल्या.

पश्चिम नागपूर मतदारसंघात प्रचारासाठी आले नसतानाही काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारालाही त्यांनी सुखद धक्का दिला. विशेष म्हणजे हा मतदारसंघ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. त्यामुळे राहूल गांधी (Rahul Gandhi) यांनी पोह्यांना दिलेल्या फोडणीची खमंग राजकीय चर्चा या मतदारसंघात रंगली आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi helicopter Stuck : राहुल गांधींचं हेलिकॉप्टर झारखंडमध्ये अडकलं, अन् संतापलेल्या काँग्रेसने आरोप करत म्हटलं...

राहूल गांधी आज विदर्भात प्रचारसभा घेण्यासाठी आले होते. सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास त्यांच्या ताफा अचनाक छत्रपती चौकात थांबला. या चौकात रामजी-श्यामची पोहेवाले प्रसिद्ध आहेत. येथे पोहे खाण्यासाठी नेहमीच तरुणांची गर्दी असते. राहूल गांधी थेट दुकानाच्या आत शिरल्याने रामजी-श्यामची यांनाही आश्चर्य वाटत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथाला होते.

त्यांनी दक्षिण -पश्चिम नागपूरचे काँग्रेस (Congress) महायुतीचे उमेदवार प्रफुल गुडधे यांना बोलावून घेतले. राहूल गांधी यांनी रामजी-श्यामची यांच्याकडून पोहे कसे बनवतात हे जाणून घेतले. त्यांच्या उपस्थितीत कढईते तेल ओतले आणि पोह्यांना फोडणी दिली. त्यानंतर खमंग पोह्याचा आस्वाद घेतला. यावेळी कॉलेज तरुणांची येथे गर्दी होती. राहुल गांधी यांनी लाकडी बाकावर बसून पोहे खात तरुणांसोबत संवाद साधला.

Rahul Gandhi
Rahul Gandhi Politics: बालेकिल्ल्यात राहुल गांधी गरजले, मोदींना आव्हान देत आदिवासींना जिंकले!

राहूल गांधी छोटे छोटे व्यावसायिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्याशी संवाद साधला. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न व घरगृहस्थीची विचारपूस केली. रामजी श्यामजी यांनाही त्यांनी दिवसाला किती उत्पन्न होते. घरामध्ये किती खर्च होतो याची विचारपूस केली. यानंतर ते आपल्या नियोजित कार्यक्रमांसाठी निघून गेले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com