Mallikarjun Kharge : भाजपवाल्यांना पुन्हा प्राथमिक शाळेत पाठवा; संविधानला कोरं पुस्तक म्हटल्यावरून मल्लिकार्जुन खरगे संतापले

Congress National President Mallikarjun Kharge was furious after BJP called the Constitution a blank book : महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा प्रकाशनात संविधानाला कोरे पुस्तक म्हटल्यावरून मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजप पक्षावर संताप व्यक्त केला.
Mallikarjun Kharge 1
Mallikarjun Kharge 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी हातात संविधान घेऊन फिरत असल्याच्यावरून भाजप सतत टीका करते. राहुल गांधी नागपूर दौऱ्यावर येताच, त्यांचा हा दौरा शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देणारा आहे, तसंच संविधानाचे कौरे पुस्तक घेऊन फिरतात आणि त्या पुस्तकाच्या रंगावरून भाजपने काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला होता.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही टीका केली होती. भाजपच्या या टीकेला काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले. आता काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तर भाजपवाल्यांना पुन्हा प्राथमिक शाळेत पाठवा, असा संताप व्यक्त केला.

काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनामाचे प्रकाशन मुंबईत झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी महाराष्ट्रातील विविध मुद्यांवर संवाद साधला. महाविकास आघाडी सत्तेत येताच पहिल्या 100 दिवसांचा कॉमन मिनिमम प्रोगोम सांगितला. तसेच महायुतीवर (Mahayuti) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांनी कोणतीही संधी सोडली नाही.

Mallikarjun Kharge 1
Narendra Modi At Jharkhand : '...असे लोक झारखंडचा विकास कधीच करणार नाहीत, मोदींचा JMM -काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

राहुल गांधी (Rahul Gandhi) नागपूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांच्या दौऱ्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली होती. राहुल गांधी यांचा दौऱ्याचा संबंध शहरी नक्षलवादाशी, संविधान पुस्तकाच्या लाल रंगावर आणि पुस्तक कोरे असल्याची टीका केली होती. राज्यात विधानसभा निडवणुकीचा धुरळा सुरू आहे. भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रीव अमित शाह यांच्या सभा सुरू आहेत. या नेत्यांनी देखील काँग्रेसवर नक्षलवादावर टीका करत आहेत. या सर्वांचा समाचार मल्लिकार्जुन खरगे यांनी समाचार घेतला.

Mallikarjun Kharge 1
Supriya Sule On Sunil Tingre : अजितदादांच्या पक्षाचे आव्हान सुप्रिया सुळेंनी स्वीकारलं; टिंगरेंनीच पाठवलेली नोटीस दाखवली

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, "संविधान दाखवून भाजपने त्याचा संबंध नक्षलवादाशी जोडला. संविधानाच्या पुस्तकाचा रंग लाल असल्याचे सांगत त्याचा संबंध नक्षलवादाशी जोडला. पण हेच संविधान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हातात आहे, याचा फोटो त्यांनी पत्रकार परिषद दाखवला".

"भाजप एवढा खोट पेरत आहे की, ते आम्हाला खोट म्हणतात. या संविधानात कोरे कागदं आहे, सांगत आहे. आता यांना पुन्हा एकदा प्राथमिक शाळेत घालण्याची वेळ आली आहे. यांना पुन्हा ट्रेनिंग देण्याची वेळ आली आहे", असा टोला देखील मल्लिकार्जुन खरगे यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com