Pune News : वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये एका प्रचार सभेदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी वडगाव शेरीचे विद्यमान आमदार आणि महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्याकडून शरद पवार यांना नोटीस पाठवण्यात आल्याचं सांगितलं होतं. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
सुनील टिंगरे यांनी देखील माध्यमांसमोर येऊन याबाबत खुलासा केला. त्यानंतर आता महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांनी ती नोटीस दाखवण्याचा आव्हान केलं. पत्रकार परिषद घेत सुप्रिया सुळे यांनी ही नोटीस दाखवली.
वडगाव शेरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे उमेदवार बापू पठारे यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेमध्ये बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मी स्वतः नोटीस पाहिली नाही, मंचावर एका व्यक्तीने ती बघितली आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी धमकी दिली आहे. जर तुम्ही पोर्शेकार अपघातामध्ये माझी बदनामी केली, तर तुम्हाला कोर्टात खेचू अशाप्रकारचा इशारा दिल्याची माहिती नोटीसमध्ये आहे".
शरद पवारांना नोटीस पाठवण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितलं. यानंतर सुनील टिंगरे यांनी माध्यमांसमोर येत आपण वैयक्तिक शरद पवारांना नोटीस पाठवली नसून महाविकास आघाडीच्या (MVA) तिन्ही पक्षांना याबाबत नोटीस पाठवली असल्याचं त्यांनी खुलासा केला. नंतर या सर्व घटनाक्रमावर रूपाली चाकणकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. रूपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्या नोटीस पाठवल्याच्या दाव्यात तथ्य असल्याने म्हटले होत्या.
"गमावलेला आत्मविश्वास आणि आलेलं प्रचंड वैफल्यग्रस्त नैराश्य, त्यामुळे सुप्रिया सुळे या सातत्याने चुकीची विधान करतात आणि तोंडावर पडतात. कोणताही पुरावा नसताना अशा प्रकारची विधानं एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या विरोधात सुप्रिया सुळे यांना शोभत नाही. जर सुप्रिया सुळे यांच्याकडे नोटीस दिल्या बाबतचा पुरावा असेल तर त्यांनी तो सबंध महाराष्ट्र पुढे मांडावा", असाही टोला चाकणकर यांनी लगावला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून वडगाव शेरी विधानसभा मतदार संघांमध्ये जो उमेदवार देण्यात आलेला आहे, त्यांच्या विरोधात त्यांच्या सुनेने विनयभंग आणि मानसिक अत्याचाराबाबत पोलिस तक्रार दाखल केली आहे. तुम्ही महिलेच्या सन्मानाच्या गोष्टी करता, मात्र उमेदवारी देताना अशा उमेदवाराला तुम्ही उमेदवारी दिली आहे. त्यामुळे हा कोणत्या प्रकारचा महिला सन्मान आहे, हे समजत नसल्याचं चाकणकर म्हणाल्या. तसंच याला वडगाव शेरीतील जनता उत्तर देईल, असा देखील इशारा दिला होता.
सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही नोटीस दाखवली. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, "या नोटीसमध्ये आम्ही जर त्यांच्यावर बोरसे अपघात प्रकरणावरून आरोप केले, तर माफी मागण्या सांगितला आहे. तसंच तसं न झाल्यास आमच्यावरती सिविल आणि क्रिमिनल अॅक्शन घेणार असल्याचं त्यात म्हटले आहे". पोर्शे अपघातामध्ये दोन युवकांचा दुर्दैवी अंत झाला. त्याबाबतच्या बातम्या सर्व वर्तमानपत्र आणि टीव्हीएसमध्ये आल्यात. त्याबाबत बोलणं जर अपराध असेल, तर तो मला मान्य आहे. नोटीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांसाठी ही नोटीस असल्याचं स्पष्टपणे सांगितले आहे. या पक्षाचे अध्यक्ष हे शरद पवार असल्याचं त्यामुळे ही नोटीस त्यांच्यासाठीच असल्याचं सुप्रिया सुळे यांनी दावा केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.