Saam Exit Poll 2024 : विजयाच्या तयारीत गुंतलेल्या कर्डिलेंना 'एक्झिट पोल'मध्ये धक्का; तनपुरेंनी नेमका काय केलाय करिष्मा?

Shock for Kardile, Tanpure surprises with performance: अहिल्यानगरमधील राहुरी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार शिवाजी कर्डिलेंनी विजयासाठी लावलेली फिल्डिंग कितपत यशस्वी झाली, हे उद्या मतमोजणीत समजेल.
Prajakta Tanpure
Prajakta TanpureSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Rahuri Constituency : लोकसभेच्या अगोदरपासून विधानसभा निवडणुकीचे गणित आखत चाललेले भाजपचे माजी आमदार तथा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांचे विजयाचे गणित फिस्कटणार, असा 'एक्झिट पोल'चा कल दिसतो.

यामुळे विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री तथा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी नेमकं कोणते गणित आखले होते, याची चर्चा रंगली आहे. कर्डिले की, तनपुरे यांचे गणित परफेक्ट जुळणार? हे आता उद्या निकालाच्या दिवशीच समजेल.

राहुरी मतदारसंघात भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यात दुरंगी लढत आहे. या लढतीचा निकाल उद्या लागणार आहे. या मतदारसंघात भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांची मोठी ताकद आहे. त्यामुळे निकालीच उत्सुकता शिगेला पोचली आहे.

Prajakta Tanpure
Saam Exit Poll 2024 : लोकप्रियता अनुराधा नागवडेंची, परंतु कौल पाचपुतेंच्या बाजूने; 'विक्रम' होणार? ...पाहा VIDEO

शिवाजी कर्डिले (BJP) यांनी विजयाची तयारी लोकसभा निवडणुकीअगोदरच सुरू केली होती. जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपदावर संधी मिळताच, मतदारसंघात मतांची जुळवाजुळव सुरू केली. निवडणूक आणि तिचा प्रचार रंगात आला असताना, शिवाजी कर्डिले यांनी बेरजेचे राजकारण करण्यावर भर दिला. यातून मतदारसंघात प्राजक्त तनपुरे एकटे पडले.

प्राजक्त तनपुरे यांच्या जवळचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ज्या ग्रामपंचायतींवर वर्चस्व आहे, तिथे सरपंच, उपसरपंच यांना हेरलं आणि विजयाचे गणित आखले आहे. हे गणित कितपत यशस्वी झाले हे उद्या मतमोजणीच्या दिवशी समजेल.

Prajakta Tanpure
Rohit Pawar : भाजपचे 25-30 कार्यकर्ते EVM ठेवलेल्या स्ट्राँग रुममध्ये घुसले; रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

प्राजक्त तनपुरे यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री पदावर संधी मिळाली. या मंत्रिपदाच्या माध्यमातून त्यांनी विकास कामांवर भर दिला. तसेच मतदारसंघातील पाणीप्रश्नावर काम केले. यातून युवकांचे संघटन त्यांनी बांधले.

नागरदेवळे ग्रामपंचयातीसह आजूबाजूच्या तीन ग्रामपंचायतींना एकत्र करत, नगरपरिषदेचा प्रस्ताव ठेवला. परंतु सत्ता गेल्यानंतर तनपुरे यांचा हा प्रस्ताव हाणून पाडण्यात आला. यावर देखील तनपुरे यांनी मतदारसंघात महायुतीविरोधात आक्रमक भूमिका कायम ठेवली.

लोकसभा निवडणुकीत देखील ताकद दाखवून दिली. 'ईडी'च्या कारवाईला देखील संयमाने समोरे गेले. त्यामुळे कसलेला राजकारणीसारखी त्यांची प्रतिमा तयार झाली. या निवडणुकीत कर्डिले यांनी तनपुरेंना घेरण्यासाठी त्यांच्या जवळचे कार्यकर्ते गळाला लावले. तसंच मतदारसंघात विजयासाठी सूक्ष्म नियोजन उभं केले.

बूथ रचनेला संमातर कार्यकर्ते ठेवले. यातून कर्डिले यांनी विजयाचे गणित जुळवून आणल्याची चर्चा आहे. परंतु एक्झिट पोलचा कल तनपुरे यांच्या बाजूने दाखवल्याने कर्डिले यांचे गणित कुठेतरी चुकले आहे, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. या चर्चांना आता उद्या निकालानंतर पूर्णविराम मिळेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com