Rohit Pawar : भाजपचे 25-30 कार्यकर्ते EVM ठेवलेल्या स्ट्राँग रुममध्ये घुसले; रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

Rohit Pawar allegations on BJP workers and EVM strong room: अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेडमध्ये आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यातील हायव्होल्टेज लढतीचा निकाल उद्या येणार आहे.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : कर्जत-जामखेडमध्ये हायव्होल्टेज लढत होत असून, भाजप अन् राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार एकमेकांविरोधात थेट लढत आहे. मतदानाच्या दिवशी एकमेकांच्या कार्यकर्ते केस पैसे वाटत आहे, याची पोलखोल सुरू होती.

मतदानाच्या दिवशी घडलेल्या या ड्राम्यानंतर आता आमदार रोहित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. 'भाजपचे सुमारे 25 ते 30 कार्यकर्त्यांनी मध्यरात्री 'ईव्हीएम' मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे', असा गंभीर आरोप करत रोहित पवारांनी खळबळ उडवून दिली.

रोहित पवार यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर पोस्ट शेअर केली आहे. भाजपच्या (BJP) सुमारे 25-30 कार्यकर्त्यांनी मध्यरात्री ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु माझे कार्यकर्ते आणि CRPF च्या जवानांनी संयमाने परिस्थिती हाताळली अन् हा प्रयत्न हाणून पाडला. या सर्वांचे आभार!, असे रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Rohit Pawar
Bachchu Kadu : काय 'कॉन्फिडंट' आहे, बच्चू कडूंचा! एवढ्या जागा निवडून येणार, महाशक्ती राज्यात टॉपवर राहणार ...पाहा VIDEO

पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल न करण्याच्या भूमिकेवर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत गुन्हा दाखल करताना भाजपच्या दबावाखाली असलेल्या स्थानिक पोलिस प्रशासनाने मात्र सहकार्य करण्याऐवजी त्रास देण्याचीच भूमिका घेतली, याची निवडणूक आयोगाने योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Rohit Pawar
BJP Booth Exit Poll : भाजपच्या बूथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना धक्का, मिळू शकतात एवढ्या जागा

गुंडगिरीला चाप बसणार

'भाजप कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न म्हणजे पराभवाच्या भितीने सुरु असलेली गुंडागर्दी आहे. पण पुढील चोवीस तासातच कर्जत-जामखेडच्या जनतेकडून लोकशाही मार्गाने या गुंडगिरीला चाप बसल्याशिवाय राहणार नाही', असा विश्वास देखील रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

मतदानाच्या दिवशी कुरघोड्या

कर्जत-जामखेडमध्ये भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या थेट लढत आहे. ही लढत पहिल्यापासून रंगतदार अन् टोकाची होत आहे. प्रचाराच्या काळात एकमेकांवर गंभीर आरोप करतानाच, मतदानाच्या दिवशी एकमेकांच्या कार्यकर्ते पैसे वाटप केल्याची पोलखोल रंगली होती. रोहित पवारांनी त्यांच्या समाज माध्यमांवर भाजप कार्यकर्ते पैसे वाटप केल्याचे अन् पोलिसांनी मोठी रक्कम पकडल्याची व्हिडिओ शेअर केले होते.

निवडणूक आयोगाकडे धाव

आमदार राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी देखील रोहित पवार यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी पैसे वाटप करत असल्याचे, बोगस मतदान करत असल्याचे व्हिडिओ शेअर केले. मतदानाच्या दिवशी हा प्रकार रंगला असतानाच, आता रोहित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रुममध्ये घुसल्याचा प्रकाराची दखल निवडणूक आयोगाने घ्यावी, अशी देखील मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com