Chhagan Bhujbal; महिलांना विधानसभा, लोकसभेत आरक्षण द्या

स्थानिक स्वराज्य संस्थाप्रमाणे महिलांना विधानसभा, लोकसभेत आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्राच्या विधीमंडळाने ठराव करावा
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : (Mumbai) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना (Womens reservation) आरक्षण देण्याचा निर्णय शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. यासारखे परिवर्तनवादी निर्णय घेताना नेहमीच विरोध होत असतो, मात्र महिलांना त्यांचे प्रश्न पूर्ण सोडवण्यासाठी कायदेमंडळात (Assembly) स्थान देणं अधिक महत्वाचे आहे, असे आवाहन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. (If Madhya Pradesh can do why not Maharashtra)

Chhagan Bhujbal
Jayant Patil; धक्कादायक, परिचारीकांकडून दोनशे कोटी गोळा केले?

स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणेच विधानसभा आणि लोकसभेत आरक्षण देण्याची गरज आहे. त्यासाठी पुरोगामी महाराष्ट्राने विधिमंडळात ठराव करून तो केंद्राला पाठवावा अशी मागणी त्यांनी सभागृहात महिला धोरणाबाबत मांडलेल्या प्रस्तावावर बोलतांना केली.

महिला धोरणावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, या देशात हजारो वर्षापासून महिलेला दुय्यम स्थान देण्यात आले. महिलांना बालविवाह, सतीप्रथा, केशवपण यासारख्या अनेक अनिष्ट प्रथाना सामोरे जावे लागले.

Chhagan Bhujbal
Nashik News: विमानसेवेसाठी आदित्य ठाकरे यांनी घेतला पुढाकार!

यासाठी महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी या अनिष्ट प्रथा झुगारून लावत महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महिलांना शिक्षणाची कवाड खुली केली. महाराष्ट्रात महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली. केशवपणाच्या विरोधात नाभिक समाजाचा संप घडवून आणला. महिलांना शिक्षणापासून वंचित न ठेवता त्यांना सन्मान देण्यासाठी त्यांनी प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

ते म्हणाले की, पवार साहेबांनी सन १९९४ साठी महिलांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले. महिलांच्या नावाने घर देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. नुकताच मध्य प्रदेश सरकारने राज्यातील एक कोटी महिलांसाठी प्रत्येकी एक हजार रुपये अनुदान देण्याची योजना घोषित केली आहे.

Chhagan Bhujbal
Ashima Mittal News: महिला सरपंचांमध्ये विकास करण्याची क्षमता

पूर्वी अशा धोरणांसाठी पुढाकार घेण्यात महाराष्ट्र पुढे असायचा मात्र आता महाराष्ट्राला या छोट्या राज्यांकडून शिकवण घ्यावी लागत आहे अशी खंत व्यक्त करत महाराष्ट्राकडे हजारो कोटी रुपयांचे बजेट आहे. जे मध्यप्रदेश सरकारला जमले ते महाराष्ट्राला का जमू नये असा सवाल उपस्थित करत महिलांसाठी सर्वसमावेशक धोरण आखण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.

ते म्हणाले की, ज्या देशांनी महिलांना समाजात महत्त्वाचं स्थान दिलं ते देश जगात प्रगतीपथावर राहिली आहे. मात्र ज्या देशात महिलांना दुय्यम स्थान देण्यात आलं ते देश आजही मागे राहिले आहे. त्यामुळे महिलांना सपोर्ट करवाच लागणार आहे. आजही कष्टाची अनेक महत्वाची कामे पुरुषांच्या बरोबरीने महिला करतात. शेती क्षेत्रातही महिला अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले.

Chhagan Bhujbal
Dilip Bankar News: कांदा आंदोलन केल्यास निधी न देण्याची धमकी?

भारतात महिलांना महत्त्वाचे स्थान दिलेले आपल्या देशात दोन महिला राष्ट्रपती झाल्या आहेत. मुख्यमंत्री झाल्या आहेत असे सांगत अमेरिकेसारख्या देशातही आज महिला राष्ट्राध्यक्ष होऊ शकल्या नाहीत असे त्यांनी आवर्जून सांगितले. ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना स्थान मिळाले. महिलांचे प्रश्न सोडवायचे असतील तर कायदेमंडळातही त्यांना समान स्थान द्यावे लागेल. परिवर्तनाचे निर्णय घ्यायचे असतील तर त्यासाठी विरोध हा होणारच आहे. या अगोदर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनाही त्रास सहन करावा लागला असेही ते म्हणाले.

महिला धोरणावर बोलत असताना नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबेश्वरमध्ये डॉक्टर रुग्णालयात नसल्याने महिलेच्या आईला आपल्या मुलीची डिलिव्हरी करावी लागली. ही अतिशय धक्कादायक बाब असल्याचे सांगत या प्रश्नाकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com