Malegaon Attack ON Former Corporator: मालेगाव हादरलं! नमाज पठण करून घरी जात असलेल्या माजी नगरसेवकावर तलवारीनं हल्ला; हाताची बोटं कापली..

Malegaon Crime News:अजिज लल्लू यांच्या डोक्याला, चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली तर हाताची बोटेही कापली आहे. मालेगावच्या हजार खोली भागातील मदिना चौकात हा हल्ला करण्यात आला.
Malegaon Attack ON Former Corporator
Malegaon Attack ON Former CorporatorSarkarnama

Malegaon News: माजी महापौरांवरील हल्ल्यानंतर मालेगावमध्ये अद्यापही हल्ल्याचे सत्र थांबलेले दिसत नाही. माजी महापौर अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा मालेगाव हादरलं.

माजी नगरसेवक व त्यांच्या मुलावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या हाताची बोट कापली गेली. मालेगावमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास माजी नगर नगरसेवक अजीज लल्लू व त्यांच्या मुलावर मोटार सायकलवरून आलेल्या तीन ते चार जणांनी धारदार शस्त्राने हल्ला चढवला.

कौटुंबिक वादातून हा हल्ला झाल्याचे समजते. अजिज लल्लू यांच्या डोक्याला, चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली तर हाताची बोटेही कापली आहे. मालेगावच्या हजार खोली भागातील मदिना चौकात हा हल्ला करण्यात आला. पितापुत्र नमाज पठण करून घरी जात असताना हा हल्ला झाला.

त्यांच्यावर मालेगावमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. गेल्या आठवड्यात माजी महापौर अब्दुल मालिक यांच्यावर गोळीबार झाला होता. आता माजी नगरसेवक लल्लू यांच्यावर हल्ला झाल्याने मालेगाव शहर हादरलं आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या जिल्ह्यातील (नाशिक) कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

नातेवाईकांशी अझीझ लल्लू यांचा जमिनी व्यवहारावरून सध्या वाद सुरु आहे. या वादातूनच हा हल्ला झाला असावा, अशी प्राथमिक माहिती आहे. माजी महापौर अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर गेल्या आठवड्यातच गोळीबार झाला होता. आज पुन्हा अशाच प्रकारचा लल्लू यांच्यावर झाल्याने शहरात तणावाचे वातावरण होते. आता या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

Malegaon Attack ON Former Corporator
Nashik Teachers Constituency 2024: शुभांगी पाटील की संदीप गुळवे? उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठा पेच

काही दिवसापूर्वी मालेगावचे माजी महापौर तसेच ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन अर्थात ‘एमआयएम’चे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर गोळीबार झाला आहे. ईसा यांच्यावर अज्ञात व्यक्तींना गोळ्या झाडल्या होत्या. मोटरसायकलवरुन आलेल्या या अज्ञात हल्लेखोरांनी ईसा यांच्यावर एकूण तीन गोळ्या झाडल्या.

यात एक गोळी त्यांच्या हाताला, एक पायाला तर एक छातीत लागली होतील्याची माहिती समोर येत आहे. अब्दुल मलिक युनूस ईसा यांना तातडीने उपचारासाठी नाशिकमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com