Nashik Teachers Constituency 2024: शुभांगी पाटील की संदीप गुळवे? उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठा पेच

Uddhav Thackeray Group News:विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. ते नाशिकच्या मातोश्री शिक्षण संस्थेचे प्रमुख आहेत. याशिवाय भाऊसाहेब कचरे, आप्पासाहेब शिंदे , अजित पवार गटाचे दत्ता पानसरे यांची नावे चर्चेत आहेत.
Nashik Teachers Constituency 2024
Nashik Teachers Constituency 2024Sarkarnama

Shubhangi Patil News: काँग्रेस नेते संदीप गुळवे (Sandeep Gulve) यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे शिक्षक मतदार संघातील उमेदवारीमध्ये नवा ट्विस्ट आला आहे.नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात अनेक जण इच्छुक आहेत. कोपरगाव (नगर) येथील संजीवनी अभिमत विद्यापीठाचे प्रमुख विवेक कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून उमेदवारीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) प्रयत्नशील होत्या. हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात यावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शुभांगी पाटील बंडखोरीच्या तयारीत असल्याचे दिसते. 5 जूनला त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.

गुळवे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे उमेदवारी नक्की कोणाला मिळणार हा नवा वाद निर्माण झाला आहे. नाशिकचे गुळवे हे मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक आहेत. त्यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली आहे.

विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. ते नाशिकच्या मातोश्री शिक्षण संस्थेचे प्रमुख आहेत. याशिवाय भाऊसाहेब कचरे (नगर), आप्पासाहेब शिंदे (नगर), अजित पवार गटाचे दत्ता पानसरे (नगर)हे संभाव्य उमेदवार चर्चेत आहेत.

महाविकास आघाडीतर्फे नाशिकचा शिक्षक मतदार संघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडण्यात आला आहे. या पक्षाने उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. आता शुभांगी पाटील माघार घेण्याची शक्यता नाही. त्या धुळे नंदुरबार आणि जळगाव अशा खान्देश मधल्या त्या एकमेव उमेदवार असतील.

Nashik Teachers Constituency 2024
Talegaon Dabhade CEO Accused Drunk Driving: मद्यधुंद मुख्याधिकाऱ्याचा 'कार'नामा; तळेगाव दाभाडे येथे दोन गाड्यांना उडवून पलायन!

शिक्षक की संस्थाचालक

या निवडणुकीत शिक्षक की संस्थाचालक हा वाद आहे. त्यात आता उमेदवार खान्देशचा की नाशिकचा हा वादही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शुभांगी पाटील यांच्या उमेदवारीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यांची उमेदवारी शिवसेनेच्या उमेदवाराला मारक ठरू शकते.गेले काही दिवस शुभांगी पाटील शिक्षक मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com