Crime News : 'औरंगजेब आणि संत निवृत्तीनाथांची समाधी सारखीच' अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षाने तोडले अकलेचे तारे

Nashik News : व्हायरल ऑडिओनंतर त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; मनसेकडून पोलिस ठाण्यात तक्रार
Crime News
Crime News sarkarnama
Published on
Updated on

Nashik :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर आणि संत निवृत्तीनाथांच्या समाधीची रचना सारखीच असल्याचा दावा करणारी ऑडीओ क्लीप त्र्यंबकेश्वरमध्ये व्हायरल झाली. त्र्यंबकेश्वरच्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) शहराध्यक्ष किरण चौधरी याने चक्क समाधींची तुलना करण्याचे धारिष्ठ केले. हा मुद्दा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी उचलून धरत चौधरी विरोधात कारवाई करण्याची मागणी केली.

Crime News
Dheeraj Kumar Health Dept : IAS धीरज कुमारांनी कुणाच्या दबावाखाली 8 हजार कोटींचे टेंडर काढले?

मनसेचे तालुकाध्यक्ष नवनाथ कोठुळे यांच्या तक्रारीनुसार चौधरीविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत ताब्यात घेतले आहे. चार दिवसांपूर्वी किरण चौधरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगजेबाची समाधी पाहण्यासाठी गेला होता. त्यानंतर ते पुन्हा त्र्यंबकेश्वरला आला. त्याने दोन दिवसांपूर्वी मित्राला कॉल केला. त्यात त्याने खुलताबादला भेट दिल्याचे सांगत औरंगजेबाची कबर पाहून खूश झाल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर संत निवृत्तीनाथांच्या समाधी आणि संत निवृत्तीनाथांच्या समाधीची रचना सारखीच असल्याचा दावा केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशेष म्हणजे याच मित्राने ती ऑडीओ क्लीप व्हायरल केली. त्यानंतर त्र्यंबकेश्वरमध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटले.शरद पवार गटाचे युवक उत्तर महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष पुरूषोत्तम कडलग यांनी हा मुद्दा उचलून धरला. सोशल मिडीयावर चौधरीचे जुने कारनामेही बाहेर काढण्यात आले. कार्यकर्त्यांनी चौधरीविरोधात गुन्ह दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, त्र्यंबकेश्वर पोलिसांनी नवनाथ कोठुळे यांच्या तक्रारीनुसार चौधरीविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करीत त्यास ताब्यात घेतले.

धनंजय मुंडेच्या दौऱ्यानंतर सुरू झाला वाद

काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतले. यावेळी काही जणांनी जाणिवपूर्वक चौधरीला मुंडे यांच्या समवेत मंदिरात येऊ दिले नव्हते. धनंजय मुंडे यांनीही त्यावेळी या बाबीकडे दुर्लक्ष केले. मात्र, चौधरीने मंदिराबाहेरच मुस्लिम धर्मीयांची टोपी परिधान करून आता आम्ही दर्शनाला कोठे जावे, असा फोटा काढीत स्टंट केला. आता हा स्टंट सुद्धा चौधरीच्या अंगलट आला असून हाच फोटा सोशल मिडीयावर टाकून चौधरी हा मुस्लीमधार्जिणा असल्याची टीका करण्यात येते आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com