Nagar District
Nagar DistrictSarkarnama

Ayodhya Ram Mandir : 48 हजार घरांवर रामाचे चित्र; 30 हजार भाविकांना बुंदीचा प्रसाद

Ahmednagar BJP : रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्यानिमित्ताने नगरमध्ये भाजपसह सर्वपक्षीय 'दिन दिन दिवाळी'
Published on

Ahmednagar News :

अयोध्येत प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोमवारी (ता. 22 जानेवारी) होत असल्याने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. याला नगर जिल्ह्याचाही अपवाद नाही. जिल्ह्यात भाजप आणि हिंदू संघटनांकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातील मंदिरांसह हिंदूंच्या घरोघरी सोहळ्याची जय्यत तयारी केली जात आहे. सर्वत्र रामनामाचा जयजयकार होताना दिसतो आहे.

नगर (Ahmednagar) शहरासह जिल्ह्यातील सर्व हिंदू धार्मिक स्थळांची स्वच्छता सुरू आहे. प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने या धार्मिक स्थळांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नगर शहरातील चितळे रोडवरील धार्मिक स्थळावर अखंड रामनामाचा जप सुरू करण्यात आला आहे.

Nagar District
Big Breaking : मोदी सरकारचा मोठा निर्णय; प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त अर्धा दिवस सुटी

भाजपकडून (BJP) नगर शहरात प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. भाजप आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) आणि शहराध्यक्ष अभय आगरकर यांच्या पुढाकारातून स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

नगर शहरातील 48 हजार घरांच्या प्रवेशद्वारावर श्रीरामाचे चित्र चिटकवण्याचा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती भाजप नेते महेंद्र गंधे यांनी दिली. तसेच शहरातील 30 हजार लोकांना बुंदीचा लाडू प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे. शिवाय प्रोफेसर कॉलनीतील रेणुकामाता मंदिरात अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात येईल आणि नगर शहरातील कारसेवकांची पाद्यपूजा करून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपकडून नगरमधील 501 जणांचा श्रीरामाची मूर्ती देऊन सन्मान करण्यात येणार आहे. खासदार सुजय विखे यांना ही मूर्ती देऊन भाजपचे नेते महेंद्र गंधे यांनी सत्कार केला. यावेळी भाजपचे माजी नगरसेवक मनोज दुल्लम उपस्थित होते.

सिद्धेश्वर तरुण मंडळातर्फे नगर शहरातील दिल्ली दरवाजा येथे रामाचे 51 फुटी कटआऊट उभारण्यात येणार आहे. तसेच दिल्ली दरवाजा परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. दरम्यान, यावेळी हनुमान चालीसाचे सामूहिक पठण करणार असल्याची माहिती भाजपचे शहर जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जाधव यांनी दिली.

नगर शहरातील स्टेशन रोड परिसरातील मंदिरासह घरोघरी एकूण 11 हजार पणती लावण्यात येणार आहे. यासाठी विकास सोशल फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे, तर मनसेच्या विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांच्याकडून प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी 550 किलो पेढ्यांचा प्रसाद वाटण्यात येईल. अयप्पा मंदिरात प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी पहाटेपासून धार्मिक कार्यक्रम होतील. दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम त्यानंतर सायंकाळी राम उत्सव पूजा होईल.

Nagar District
Ratnagiri konkan : ...तर संपूर्ण कोकणचे अस्तित्व धोक्यात!

ठाकरे गटाकडून कारसेवकांचा सन्मान

नगर शहर शिवसेनातर्फे (ठाकरे गट) कारसेवकांचा सन्मान करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 11 वाजता शिवालय येथे हा कार्यक्रम होईल, अशी माहिती माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी दिली. अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे, यासाठी अनेक वर्षांपासून लढा देण्यात आला. यामध्ये अनेकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली.

1988 पासून अयोध्येत कारसेवकांनी राम मंदिरासाठी प्रयत्नशील होते. त्यावेळी अनेक अडचणींचा सामना करून श्रीराम मंदिराचा लढा लढले आहेत. अयोध्येत श्रीराम मंदिर होत आहे, त्यात या कारसेवकांचे योगदान राहिले आहे, अशा नगर शहरातील कारसेवकांचा सन्मान करुन त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यात येणार असल्याचे भगवान फुलसौंदर यांनी सांगितले.

केडगाव भाजप मंडलतर्फे पणत्यांचे वाटप

केडगाव भाजप मंडलतर्फे भूषणनगर परिसरातील रहिवाशांना पणत्यांचे वाटप माजी मंडल अध्यक्ष साहेबराव विधाते व माजी शहराध्यक्षा आशा विधाते यांच्यावतीने करण्यात आले. माजी मंडल अध्यक्ष पंकज जहागिरदार, धनंजय जामगावकर, सुरेश रपारिया उपस्थित होते.

माजी आमदार कोल्हेंकडून स्वच्छतासेवा

कोपरगाव येथील भाजपच्या माजी आमदार यांच्या नेतृत्वाखाली गावातील तीर्थक्षेत्र आणि मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कोपरगाव शहरातील श्रीराम मंदिरात सेवा व परिसरात साफसफाई केली. यावेळी त्यांनी हातात झाडू, मॉब घेऊन श्रीराम मंदिराचा सभामंडप परिसराची स्वच्छता केली. तसेच श्री महादेव मंदिरातही त्यांनी साफसफाई केली. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने सर्वांनी घरोघरी श्रीराम ज्योत प्रज्वलित करावी, श्रीराम दीप, कंदील लावून अभूतपूर्व अशी दिवाळी साजरी करावी, असे आवाहन स्नेहलता कोल्हे यांनी केले.

(Edited by Avinash Chandane)

R...

Nagar District
Nashik Kalaram Mandir : देशात अयोध्या, तर महाराष्ट्रात 'काळाराम' केंद्रस्थानी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com