Big Breaking : मोदी सरकारचा मोठा निर्णय; प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त अर्धा दिवस सुटी

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठापना सोहळा...
Ram Mandir
Ram MandirSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला होणार असलेल्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या देशभरातील सर्व कार्यालयांना अर्धा दिवस सुटी जाहीर करण्यात आली आहे. सर्व सरकारी कार्यालये, केंद्रीय संस्था, केंद्रीय औद्योगिक आस्थापनांचे कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत बंद ठेवले जाणार आहे.

देशभरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यामध्ये सर्वांना सहभागी होता यावे, यासाठी अर्धा दिवस सुटी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारने (Central Government) काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांसाठी हा निर्णय लागू असेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दुपारी अडीचपर्यंत सुटी मिळणार असून त्यानंतर कार्यालये सुरू होतील. (RamLalla PranPratishtha ceremony)

Ram Mandir
Sharad Pawar : शरद पवारही 22 तारखेला अयोध्येला जाणार नाहीत; कारण वेगळंच दिलं...

दरम्यान, प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी लाखो संख्येने रामभक्त अयोध्येत पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच देशभरातील राम मंदिरांमध्येही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. घरोघरी दिवे लावून हा सोहळा साजरा करावा, असे आवाहनही केले जात आहे.

गोव्यासह काही राज्यांनी सोहळ्यानिमित्त शाळांना सुटी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातही सुटी जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत अद्याप महाराष्ट्र (Maharashtra) सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

R...

Ram Mandir
India Alliance : उत्तर प्रदेशातून ‘इंडिया’साठी खुशखबर; अखिलेश यांचं मोठं विधान...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com