Dindori Lok Sabha Constituency : अहो आश्चर्यम...! एक लाख मते घेणाऱ्या उमेदवाराचा खर्च अवघा वीस हजार!

Lok Sabha Election 2024 : भाजपच्या डॉ. भारती पवार यांचा निवडणुकीत पराभव झाला. भास्कर भगरे विजयी झाले. या दोन्ही उमेदवारांच्या जय आणि पराजयापेक्षा सर्वाधिक चर्चा झाली, ती बाबू भगरे नावाच्या अज्ञात उमेदवाराची.
Bhaskar Bhagre
Bhaskar BhagreSarkarnama
Published on
Updated on

Nashik, 05 July : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा एक उमेदवार विशेष चर्चेत होता. या उमेदवाराला कोणत्याही मतदाराने पाहिले नाही. पत्रकारांना शोध घेऊनही तो सापडला नाही. त्या उमेदवाराने एक लाख मते घेतली असून त्यांचा खर्च अवघा वीस हजार रुपये झाला आहे.

या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार (Bharati Pawar) उमेदवार होत्या. महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP) भास्कर भगरे (Bhaskar Bhagre) उमेदवार होते. या दोघांमध्ये अतिशय चुरशीची लढत झाली. त्यात भाजपच्या डॉ. पवार पराभूत झाल्या. या निवडणुकीत डॉ. पवार यांचा पराभव झाला. भास्कर भगरे विजयी झाले. या दोन्ही उमेदवारांच्या जय आणि पराजयापेक्षा सर्वाधिक चर्चा झाली, ती बाबू भगरे (Babu Bhagre) नावाच्या अज्ञात उमेदवाराची.

या उमेदवाराने नुकताच आपला खर्च निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. त्यात वीस हजार रुपये खर्च केले, असे नमूद केले आहे. वीस हजार रुपये एवढ्या नगण्य खर्चातही त्यांना एक लाख ३ हजार ६३२ मते मिळाली आहेत.

विशेष म्हणजे या बाबू भगरे यांनी मतमोजणी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पोटात गोळा आणला होता. जवळपास एक लाख मते मिळाल्याने ते चर्चेचा विषय आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगरे यांचे मताधिक्य घटविले नशिब. नाही तर बाबू भगरे यांच्यामुळे भास्कर भगरे पराभूत झाले असते.

वस्तूत: राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भास्कर भगरे हे शिक्षक आहेत. या बाबू भगरे यांचा उमेदवारी अर्ज राजकीय डावपेचाचा भाग म्हणून भाजपने दाखल केला होता, असे बोलले जाते. बाबू भगरे नावाच्या पुढे सर हे देखील लिहिण्यात आले होते. वस्तूत: बाबू भगरे अल्पशिक्षित व्यक्ती आहेत. त्यांच्या नावापुढे 'सर' ही उपाधी का लावण्यात आली, याचे समाधानकारक उत्तर अद्याप मिळालेले नाही.

Bhaskar Bhagre
Vidhan Parishad Election : विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार का? महायुती-महाआघाडीचे असे आहे गणित...

नाम साधर्म्याचा राजकीय फायदा उठवण्याचा भाग म्हणून या उमेदवारीकडे पाहिले जाते. त्यातही या आदिवासी मतदारसंघात बाबू भगरे यांना प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून मतदान झालेले दिसते. विशेषतः दिंडोरी या खासदार भगरे यांच्या घरच्या मतदार संघात त्यांना सत्तावीस हजार, तर कळवण या डॉ. पवार यांच्या मतदारसंघात वीस हजार ८३४ मते मिळाली आहेत.

या मतांमुळेच निवडणुकीत बाबू भगरे चर्चेचा विषय होते. कोणालाही न दिसलेले बाबू भगरे निवडणूक आयोगाकडे खर्च दाखल केल्यानंतर देखील तेवढेच उत्सुकतेचा विषय बनले आहेत.

एकीकडे दिंडोरी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा पाऊस पाडण्यात आल्याची चर्चा आहे. विरोधी उमेदवार भास्कर भगरे यांना मतदारांनी लाखो रुपयांच्या देणग्या दिल्या. याहूनही गमतीचा भाग म्हणजे उपजीविकेची चिंता असलेल्या बाबू भगरे यांनी निवडणुकीसारख्या विषयावर वीस हजारांचा खर्च केला आहे आणि त्यांना मतेही लक्षणीय मिळाली आहेत. कदाचित हा राज्यभर गमतीचा विषय म्हणूनही पाहिला जाईल.

Bhaskar Bhagre
Indapur Politics : इंदापूरची वाटचाल तिरंगी लढतीकडे; पाटील, भरणेंनंतर शरद पवार गटाचाही शड्डू

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com