Lok Sabha Result 20024 : नाशिकमध्ये वाजे 10 हजार तर दिंडोरीत भास्कर भगरे यांना 500 मतांनी आघाडीवर

Nashik constituency dindori constituency Bhaskar Bhagare rajabhau waje Lead : दिंडोरी मतदार संघात पहिल्या फेरीत झालेल्या मतमोजणीत शरद पवार गटाचे भास्कर भगरे 500 मतांनी आघाडीवर आहेत. या मतदारसंघात विधानसभा निहाय संमिश्र चित्र आहे.
Rajabhau Waje, Hemant Godse
Rajabhau Waje, Hemant GodseSarkarnama
Published on
Updated on

Loksabha 2024 election Result: लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. पहिल्या फेरीत शरद पवार गटाचे भास्कर भगरे आघाडीवर आहेत.नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे आघाडीवर आहेत. त्यांना सिन्नर इगतपुरी देवळाली आणि नाशिक मध्य मतदारसंघातून आघाडी मिळाली आहे.

वाजे यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना Shivsena शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना नाशिक पूर्व आणि पश्चिम मतदारसंघात अल्प आघाडी आहे. पहिल्या फेरीत शिवसेना ठाकरे गटाचे वाजे यांनी 10 हजार मतांची आघाडी घेतली आहे.

दिंडोरी मतदारसंघात पहिल्या फेरीत झालेल्या मतमोजणीत शरद पवार गटाचे भास्कर भगरे 500 मतांनी आघाडीवर आहेत. या मतदारसंघात विधानसभा निहाय संमिश्र चित्र आहे. मतमोजणी प्रारंभी शासकीय कर्मचारी आणि पोस्टाने आलेल्या मतांची मोजणी करण्यात आली आहे दिंडोरी मतदार संघात शासकीय कर्मचाऱ्यांचे 2137 आणि टपालाने आलेल्या 3173 असे पाच हजार तीनशे दहा मते आहेत.

नाशिक मतदारसंघात शासकीय कर्मचाऱ्यांची 1275 आणि पोस्टाने आलेल्या 3076 अशी 4351 मते आहेत. मतमोजणीला प्रारंभ करण्यापूर्वी नाशिक मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा आणि दिंडोरी मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे यांनी कर्मचाऱ्यांना गोपनीयतेची शपथ दिली.

Rajabhau Waje, Hemant Godse
Shantigiri Maharaj : मतमोजणी नाशिकला, शांतिगिरी महाराज अद्याप काशीला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com