Pune News: माढा लोकसभा मतदारसंघातून अखेर मोहिते पाटील घराण्यातून बंडखोरी होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 13 एप्रिलला शरद पवारांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील (Dhaiyasheel Mohite Patil) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.
अकलुजच्या विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम होणार आहे. 13 एप्रिलला त्यांच्या वाढदिवस आहे. वाढदिवशी ते मोठा निर्णय घेणार असल्याचे बोलले जाते.
कार्यक्रमास मोहिते पाटील कुटुंबातील कोण कोण व्यक्ती उपस्थित राहतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. धैर्यशील पाटील यांनी बंडखोरी करायच ठरवले आहे. या परिस्थितीत महायुतीत असलेले फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचे बंधू काय भुमिका घेता हे देखील महत्वाचे ठरणार आहे. तेही शरद पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे समजते.
भाजपकडून माढा लोकसभेसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण त्यांच्या उमेदवारीला धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांचा विरोध होता.
दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. भाजप आणि अजित पवार गटाकडून या दोन्ही नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्नदेखील केले गेले. धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे माढा लोकसभेच्या उमेदवारीची माळ धैर्यशील मोहिते पाटलांच्या गळात पडेल, असे चित्र आहे.
धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातून तुतारी चिन्हावर लढण्याची शक्यता आहे. ते मतदारसंघातील गावोगावी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मोहिते पाटील यांच्यावर समर्थकांकडून दबाव वाढत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.