Bachchu Kadu : 'हे सर्व ईव्हीएम मशिनचे पहिलवान', बच्चू कडूंनी कुणाला घेतलं निशाण्यावर?

Bachchu Kadu On Bjp : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढाव्यात की नाही, हा विचार करावा लागत आहे. कारण सगळीच यंत्रणा भाजपच्या ताब्यात आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.
Bachchu Kadu
Bachchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Bachchu Kadu : राज्यातल्या सगळ्या सरकारी शाळांमधील मतदान केंद्र बंद करुन ती भाजपच्या कार्यालयात ठेवायला हवीत. मतदान हे भाजपच्या कार्यालयातून झाले पाहीजे. मतदान यंत्र भाजपच्या कार्यालयात ठेऊन त्यांचीच मंडळी बटण दाबतील व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांचे उमेदवार निवडून आणतील असा टोला प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी लगावला आहे.

नाशिकमध्ये येवला येथे ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर आपल्या शैलीत प्रहार केला. ते म्हणाले, निवडणूक आयोग यांचा मित्र झाल्यामुळे यांना मस्ती आली आहे. हे सगळे ईव्हीएम मशिनचे पहिलवान आहेत. एकवेळ खिसे कापू परवडला पण हे नको. ईव्हीएम व ईडी या भाजपने आपल्या ताब्यात घेतलेल्या संस्था आहेत. त्यांचा मर्जीप्रमाणे वापरु सुरु असून संविधानाची चिरफाड सुरु असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली.

कडू पुढे म्हणाले, धमक असेल तर व्हीव्हीपॅट येतो तो आमच्या हातात द्या. आम्ही त्यावर सही करुन मतपेटीत टाकतो. तुमच्यात मर्दानगी असेल तर तर मग हे करुन पहा. मग कळेल कोण जिंकतो ते..देशात म्हणायला लोकशाही आहे, परंतु भाजपची हुकूमशाही राहणार अशी परिस्थिती दिसत आहे. लोकशाहीचे पतन सुरु असल्याची टीका त्यांनी केली.

Bachchu Kadu
Girish Mahajan : भुजबळांच्या टोल्याला महाजनांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं..म्हणाले जळगावची चिंता..

सर्वोच्च न्यायालयाने ईडी ला फटकारल्याच्या मुद्यावर विचारले असता कडू म्हणाले, मी गवई साहेबांना सॅल्युट करतो. त्यांनी बाणेदारपणा दाखवला असून, सुप्रीम कोर्ट तरी संविधानाचा आदर करुन चालेल असं वाटत आहे.

ठाकरे बंधूच्या युतीवरही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले काय किंवा पवारसाहेब भाजपकडे गेले काय त्याने काहीही फरक पडणार नाही. कांदा, सोयाबीन, कापूस कोणत्याही पिकाला भाव नाही. शिक्षण आणि आरोग्याचे काय ? ठाकरे बंधूंची मुंबईत सत्ता आली तरी शेतकरी, मजूर, आरोग्य व्यवस्थेचे प्रश्न सुटणार आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Bachchu Kadu
Raut Vs Mahajan Politics: संजय राऊत यांचा पलटवार, "गिरीश महाजन तुम्ही प्रमोद महाजन नव्हे, जामनेरचे महाजन आहात"

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागल्याचे विधान मंत्री गणेश नाईक यांनी केले होते. त्यावर बच्चू कडू म्हणाले, इथे सर्वसामन्य माणसाला कधीच लॉटरी लागत नाही. फक्त मंत्र्यांना आणि उद्योगपतींनाच लॉटरी लागते अशी टीका त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com