Bachhu Kadu News: पहलगाम येथे २८ पर्यटक दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावले. या ठिकाणी एकही सुरक्षा रक्षक का नव्हता? हे अतिशय गंभीर कोडे आहे. सामान्य नागरिकांच्या मनात हा प्रश्न आहे. केंद्र सरकारला याची जबाबदारी घ्यावीच लागेल.
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी पहलगाम हल्ल्याबाबत केंद्र सरकारला गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. सरकार सामान्य जनता आणि गरिबांना धार्मिक रंग दाखवून भुलवते आहे. तिकडे गरिबांच्या खिशातून मोठ्या प्रमाणावर पैसा काढून घेतला जात आहे. त्यामध्ये सर्वाधिक गरीबच कोरफळला जातो.
केंद्रातील भारतीय जनता पक्षाने श्रीमंतांच्या हिताचे धोरण राबविले आहे. गेल्या बारा वर्षात जगभर कच्च्या तेलाच्या किमती ४० टक्के कमी झाल्या. मात्र भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर १५ रुपये वाढले आहेत. यातून भरमसाठ महागाई झाली. देशभरातील जनता या महागाईत होरपळते आहे.
केंद्र सरकारच्या या धोरणामुळे पेट्रोल आणि डिझेलचा व्यवसाय करणाऱ्या देशातील सात कंपन्यांना सात लाख कोटी रुपये मिळाले. दुसरीकडे केंद्र शासनाला ४० लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला. यातील ७५ टक्के पैसे गरिबांच्या खिशात न काढून घेण्यात आले आहेत.
सामान्य जनतेची अशी लूट होत असताना दुसरीकडे त्याला उपचारासाठी कोणत्याही सुविधा नाहीत. त्याच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी सरकार कोणतेही ठोस निर्णय घेताना दिसत नाही. गरिबांना उपचार एवढे महाग झाले आहेत की, पदोपदी त्यांची ही लूट सुरूच आहे.
शिक्षण हा सर्वात मोठा व्यवसाय होऊ पाहत आहे. संख्या आणि वर्ग संख्या यातून मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची कपात केली जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शाळा बंद होत आहेत. भविष्यात शिक्षण हा सर्वात मोठा धंदा होऊन बसेल. आजूबाजूला सर्व अदानी आणि अंबानी यांच्यात शाळा उभ्या राहतील. यापूर्वी जातीच्या नावाखाली गरिबांना शिक्षण नाकारले जात होते. पैसे नाही म्हणून शिक्षण घेता येणार नाही अशी स्थिती सध्याच्या सरकारने करून ठेवली आहे.
सामान्य जनतेला त्रस्त करणाऱ्या या प्रश्नांकडे आपले लक्ष जाऊ नये यासाठी धार्मिक अजेंडा राबविला जात आहे. प्रत्येक नागरिकाच्या डोक्यात भगवा, निळा, पिवळा, हिरवा असा रंगाचा धर्म चिटकवला जात आहे. सामान्यांनी याबाबत वेळेत सावध होऊन, जागे व्हावे. अन्यथा भविष्यात मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.