Eknath Shinde : सदस्य नोंदणीचे दीड लाखांचे टार्गेट, पूर्ण करता-करता शिंदे गटाचे नाकीनऊ

Shiv Sena Shinde faction struggles to meet 1.5 lakh membership target in Jalgaon political campaign : जळगाव जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे सदस्य नोंदणी अभियान सुरु आहे. मात्र, शिंदे गटाला या अभियानात थंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon political news : जळगाव जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे सदस्य नोंदणी अभियान सुरु आहे. मात्र, शिंदे गटाला या अभियानात थंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जिल्ह्यात दीड लाखांचे उद्दिष्ट पूर्ण करताना नाकीनऊ आले आहेत. तीन महिन्यात जेमतेम ४० टक्केच सदस्य नोंदणी झाली आहे. त्यावरुन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सदस्य नोंदणीत कमी पडलेल्या पदाधिकाऱ्यांना चांगलच फैलावर घेतलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने जळगावात महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी तीन्ही पक्ष जोरात कामाला लागले आहेत. तीन्ही पक्षांनी येथे नवीन सदस्य नोंदणीवर भर दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचा संवाद मेळावा शनिवार पार पडला. त्या मेळाव्यात गुलाबराव पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सदस्य नोंदणीत पिछाडीवर पडलेल्या जळगाव शहरासह ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांना चांगलच धारेवर धरलं. कोणत्याही परिस्थितीत सदस्य नोंदणी वाढवा म्हणून त्यांनी आदेश दिले.

Eknath Shinde News
Nashik News : रक्षकच बनला भक्षक, पतीला ठार करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार, पोलिसाला अटक

याच दरम्यान त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मोलाचा सल्लाही दिली. महिलांची नोंदणी करताना ज्याने लाडकी बहिण योजना सुरु केली व पैसे दिले त्या दाढीवाल्या बाबाचा म्हणजे एकनाथ शिंदे यांचा हा पक्ष असल्याचं सांगा असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. त्यामुळे महायुतीमधील लाडकी बहीण योजनेसंदर्भात श्रेयवादाची लढाई आजूनही संपलेली दिसत नाही हे पुन्हा एकदा सिद्द झालं. यातून काहीही करुन सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट गाठण्याचा मानस शिंदे गटाचा दिसतो आहे.

जळगाव जिल्ह्यात पक्षाकडून सुमारे दीड लाख नवीन सदस्य नोंदणीचे टार्गेट देण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात तीन महिन्यात जळगाव शहरातून 10 हजार, जळगाव ग्रामीणमधून 17 हजार आणि शिंदे गटाचे आमदार असलेल्या पाचोरा, चोपडा, एरंडोल-पारोळा आणि मुक्ताईनगर या मतदारसंघातून 25 हजारावर नवीन सदस्य नोंदविण्यात आले आहेत. दीड लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जळगाव शहर आणि ग्रामीणच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अधिकाधिक प्रयत्न करण्याच्या सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या आहेत.

Eknath Shinde News
Gulabrao Patil : लाडक्या बहिणींना दाढीवाला बाबा पैसे देतो म्हणून सांगा, गुलाबरावांच्या दाव्याने महायुतीत पुन्हा बिघाडी?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जळगाव जिल्ह्यात महायुती एकत्र युती म्हणून लढणार की स्वतंत्र हे आजून ठरले नाही. मात्र गुलाबराव पाटील यांनी मतदारसंघनिहाय संपर्क मोहीम राबविण्यासह गट, गणनिहाय नियोजन करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना केल्या. किमान एक लाख नवीन सदस्यांची विक्रमी नोंदणी करण्यासाठी कामाला लागा, तळागाळात जाऊन काम करा असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com