Shivaji Kardile Vs Shashikant Gade : विखेसाहेब कर्डिलेंबाबतचे 'ते' भाकीत आठवले का? 'शिवसेने'च्या गाडेंनी डिवचलं...

Ahmednagar Lok Sabha Election News : लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी शिवाजी कर्डिलेंबाबत केलेले भाकीत केले होते. सुजय विखे यांना गाडे यांनी या भाकीताचा आठवण करून दिली आहे.
Shivaji Kardile- Sujay Vikhe- Shashikant Gade
Shivaji Kardile- Sujay Vikhe- Shashikant GadeSarkarnama

Ahmednagar Politics News : लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्या पराभवाला अनेक कारणे कारणीभूत आहे.पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगर दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी विखे यांच्या पराभवामागील मोठे कारण सांगितले आहे. 'माजी आमदार शिवाजी कर्डिले ज्या खासदाराच्या मागे असतात,तो खासदार पडतो, हे माझे भाकीत खरे ठरले आहे', असे म्हणून प्रा.गाडे यांनी विखेंबरोबर माजी आमदार कर्डिले यांना डिवचले आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुजय विखे आणि राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे नीलेश लंके यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत मंत्री राधाकृष्ण विखे यांनी पुत्र सुजय यांच्या विजयासाठी मैदानात खूप मोठी ताकद उभी केली होती. नगर शहर आणि तालुक्यात शिवाजी कर्डिले, त्यांचे जावई आमदार संग्राम जगताप आणि माजी महापौर संदीप कोतकर यांची ताकद आहे. मंत्री विखे यांचा हा प्रयोग नगरकरांना रुचला नाही. सुजय विखे यांना 2019 मध्ये नगर शहर विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या मताधिक्यात मोठी घसरण झाली, यातून मंत्री विखे यांचा हा प्रयोग किती फेल गेला, याचे विश्लेषण करता येईल

निवडणुकीच्या मैदानात विखे आणि लंके यांच्यानिमित्ताने महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या नेत्यामध्ये घमासान झाले. निवडणुकीच्या निमित्ताने उणी-धुणी काढली गेली. यात माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे पारंपारिक राजकीय प्रतिस्पर्धी शिवसेना ठाकरे पक्षाचे नगर दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी कर्डिले यांना डिवचले आहे. 'शिवाजी कर्डिले ज्या खासदारांच्या मागे असतात, तो खासदार पडतो', असे भाकीत केले होते. आणि तो दावा खरा ठरल्याची आठवण प्रा. गाडे यांनी करून दिली. हा दाव्याची आठवण करून देखील प्रा. गाडे यांनी विखेंबरोबर कर्डिले यांना देखील डिवचले आहे.

Shivaji Kardile- Sujay Vikhe- Shashikant Gade
Prajakt Tanpure : लंकेंच्या विजयानंतरही तनपुरेंच्या पदरी अधिकचा गृहपाठ, धाकले विखे डावपेचाचे प्रहार करणार?

शशिकांत गाडे म्हणाले, कर्डिले-कोतकर-जगताप यांच्याविरोधात मागच्यावेळी विखे निवडणूक लढले होते. त्यामुळे ते विजयी झाले, पण यंदा विखे यांनी त्यांना बरोबर घेतल्याने त्यांचा पराभव झाला. मागच्यावेळी अनिलभैय्या राठोड यांनी विखेंना साथ दिली. पण सहा महिन्यांनी त्यांनी राठोडांविरोधात काम केले. त्यामुळे त्याला जनतेने उत्तर दिले. लंकेचा विजय हा अनिलभैय्या यांना श्रद्धांजली आहे, अशी भावना देखील प्रा.गाडे यांनी व्यक्त केली.

(Edited by : Chaitanya Machale)

Shivaji Kardile- Sujay Vikhe- Shashikant Gade
Rajendra Phalke On Radhakrishna Vikhe : बुंदीचे लाडू वाटले, 'राष्ट्रवादी'ने विखेंच्या पराभवावर मीठ चोळले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com