Balasaheb Nahata Arrest : श्रीगोंद्याचे बाळासाहेब नाहाटांना अटक; बिगरजामीनपात्र वॉरंटनंतर कारवाई, 11 जणांची 9.49 कोटींची कथित फसवणूक प्रकरण

Cooperative leader Balasaheb Nahata detained in alleged ₹9.49 crore fraud investigation : पुण्यातील गुन्ह्यात 2.60 कोटींच्या तक्रारीपासून तपासाला सुरुवात; पोलिसांच्या तपासानुसार 11 जणांची सुमारे 9.49 कोटी रुपयांची कथित फसवणूक, पुढील तपासासाठी पुणे पोलिसांकडे सुपूर्द.
Balasaheb Nahata Arrest
Balasaheb Nahata ArrestSarkarnama
Published on
Updated on

Balasaheb Nahata Fraud Case : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीणकुमार नाहाटा उर्फ बाळासाहेब नाहाटा यांना कथित आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेत पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

न्यायालयाने त्यांच्याविरोधात बिगरजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या घडामोडीमुळे श्रीगोंद्यासह सहकार आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पुण्यातील (Pune) वाकड येथे राहणारे सॉफ्टवेअर अभियंता राहुल रामराजे मक्तेदार (वय 43) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तब्बल 2 कोटी 60 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात बाळासाहेब नाहाटा, अजय चौधरी आणि रविराज जोशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान या तिघांनी एकूण 11 जणांची सुमारे 9 कोटी 49 लाख 35 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.

या प्रकरणात अजय चौधरी आणि रविराज जोशी यांना यापूर्वीच अटक (Arrest) करण्यात आली होती. त्यानंतर अजय चौधरी यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, तपासादरम्यान बाळासाहेब नाहाटा हजर राहत नसल्याने न्यायालयाने त्यांच्या विरोधात बिगरजामीनपात्र वॉरंट जारी केले. नाहाटा श्रीगोंद्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर श्रीगोंदा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना पुढील तपासासाठी पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

Balasaheb Nahata Arrest
Amol Khatal Vs Balasaheb Thorat : 'भावी मुख्यमंत्र्याचा पराभव करून आलो'; आमदार अमोल खताळांचा बाळासाहेब थोरातांना अप्रत्यक्ष टोला

फिर्यादीनुसार, शासकीय योजनांमध्ये लाभ मिळवून देणे, जमीन व्यवहार करून देणे, कंपनीच्या कामकाजातून मोठा आर्थिक परतावा मिळवून देण्याचे आश्वासन देत विविध व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम स्वीकारण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच, विविध बँक खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचाही उल्लेख पोलिसांच्या तपासातील कागदपत्रांमध्ये असल्याचे समजते.

Balasaheb Nahata Arrest
Fake Disability Certificate : तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या पडताळणी मोहिमेत नवा खुलासा; बनावट दिव्यांग प्रमाणपत्रासाठी शिक्षकाची मदत?

श्रीगोंदा तालुक्यात प्रभावी राजकीय नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या बाळासाहेब नाहाटा यांच्या अटकेमुळे स्थानिक राजकारणात तसेच बाजार समिती आणि सहकार क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पुणे पोलिसांकडून सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेनंतर पुढील कारवाई होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com