Balasaheb Thorat News: '... त्याची किंमत मोदींना चुकवावी लागणार' ; बाळासाहेब थोरातांचं विधान!

Balasaheb Thorat On PM Modi : जनता मोदींना यंदाच्या निवडणुकीत घरी बसवणारचं, असंही थारोत म्हणाले आहेत.
Balasaheb Thorat vs PM Modi
Balasaheb Thorat vs PM ModiSarkarnama

Congress Vs BJP Politics : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पाच दिवस लोकसभा निवडणूक प्रचार दौरा केला. याबाबतचे निरीक्षण त्यांनी मांडले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पूर्णतः पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात वातावरण आहे. जनता पंतप्रधान मोदी यांना यंदाच्या निवडणुकीत घरी बसवणारचं असे चित्र आहे. तसेच, मोदी सरकारकडून सरकारी यंत्रणांचा सुरू असलेला गैरवापर पाहता, याची किंमत मोदींना नक्कीच चुकवावी लागेल, असंही थोरात यांनी म्हटलं.

थोरात यांच्या उपस्थितीत मंगळवारी नाशिकच्या काँग्रेस कार्यालयात नवनियुक्त जिल्हाध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी कार्यभार स्वीकारला. या वेळी मावळते अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्यासह विविध नेते उपस्थित होते. कोतवाल यांचा बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Balasaheb Thorat vs PM Modi
PM Modi and Uddhav Thackeray : मोदींपाठोपाठ परभणीत उद्धव ठाकरेंचीही तोफ प्रचार सभेतून धडाडणार!

बाळासाहेब थोरात म्हणाले, विदर्भाच्या प्रचार दौऱ्यात लोकांमध्ये एक वेगळेच वातावरण दिसून आले. काँग्रेस पक्षाबद्दल अतिशय अनुकूल स्थिती आहे. महाराष्ट्रातील सबंध निवडणूक आणि वातावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi) आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे. त्यामुळे ही निवडणूक काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येकाने झोकून देऊन काम करावे. कोणतीही कसर सोडू नये. देशातील जनतेला भारतीय जनता पक्षापासून मुक्तता हवी आहे. या वेळी आपण कमी पडता कामा नये. भाजपच्या पराभवासाठी सर्व ताकद पणाला लावावी, असे आवाहन केले.

याशिवाय ते म्हणाले 'मी मतदारांशी निवडणुकीबाबत बोललो, यंदा मतदारांनी उमेदवार कोण आणि चिन्ह काय याला महत्त्व दिलेले नाही निवडणूक पूर्णतः नागरिकांनी हातात घेतली आहे. मोदींचा पराभव हे एकमेव ध्येय ठेवून ते मतदान करणार आहेत. या निवडणुकीत आपल्याला पंतप्रधान मोदी यांचा पराभव करायचा आहे हे एकमेव उद्दिष्ट ठेवून सगळे मतदार मतदानाची वाट पाहत आहेत,' असंही थोरात म्हणाले.

तसेच, 'मतदारांमध्ये विविध मतप्रवाह आहेत. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा मोदी निवडून आले तर, देशात हुकूमशाही येते की काय याची भीती आहे. लोकशाही संपुष्टात येईल की काय याची चिंता सगळ्यांना आहे. देशाची राज्यघटना मोडीत काढली जाईल की काय अशी स्थिती आहे. शेतकरी आणि महिलांवर प्रचंड अत्याचार केले जात आहेत. त्यावर पंतप्रधान साधे तोंड उघडत नाहीत ही सामान्यांची खंत आहे. त्यामुळे सामान्य मतदार आणि नागरिक अतिशय चिंतेत आहेत. ही चिंता ते मतदानातून व्यक्त करतील यात अजिबात संशय नाही,' असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.

Balasaheb Thorat vs PM Modi
Chhagan Bhujbal News : नाशिकच्या उमेदवारीचा घोळ कायम असतानाच भुजबळांची प्रचारात उडी

याचबरोबर 'मी अनेक निवडणुका पाहिल्या आहेत. निवडणुकांची तयारी सामान्यता जाहीरनामा बैठका मेळावे अशी होत असते. मात्र पंतप्रधान मोदी यांनी वेगळीच तयारी केली आहे. त्यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या सगळ्यांना कामाला लावले आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना नोटीस पाठवा, विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाका, विरोधी पक्षाच्या लोकांवर छापे टाका, सरकारी यंत्रणा आपल्या हितासाठी वापरा, स्वायत्त संस्थांच्या कामकाजात हस्तक्षेप करा, अशी ते तयारी करीत आहेत. हे सर्व लोकांना अजिबात पसंत नाही. त्यामुळे सबंध देशातील वातावरण बदलू लागले आहे. त्याची किंमत मोदी यांना चुकवावी लागेल, असा दावा थोरात यांनी केला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com