Chhagan Bhujbal News : नाशिकच्या उमेदवारीचा घोळ कायम असतानाच भुजबळांची प्रचारात उडी

Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक मतदारसंघातून राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतली असताना महायुतीच्या उमेदवारीचा अद्याप घोळ सुरू आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

Maharashtra Political News : नाशिक लोकसभा ( Nashik Lok Sabha Election 2024 ) मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांना येथून उमेदवारी अपेक्षित आहे. मात्र, अद्याप महायुतीने उमेदवारांची घोषणा केलेली नाही.

महायुतीची उमेदवारी अपेक्षित असलेले मंत्री छगन भुजबळ यांनी आता उमेदवारीची प्रतीक्षा करणे थांबविल्याचे दिसते. भुजबळ यांनी उमेदवारीची घोषणा होईल तेव्हा होईल, असा विचार करून महायुतीच्या प्रचारात भाग घेतला आहे.

भुजबळ ( Chhagan Bhujbal ) मंगळवार ( 16 एप्रिल ) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांच्यासह राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात चंद्रपूर येथे भाजपसाठी विविध ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत.

या सभेत ते महाविकास आघाडीला लक्ष्य करतील. येत्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचे भुजबळांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीच्या घटक पक्षांमध्ये राज्यातील चार ते पाच मतदारसंघात जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. विशेषतः नाशिक ठाणे सिंधुदुर्ग आणि सातारा या चार मतदारसंघांचा वाद सुरू आहे. महायुतीचे जागावाटप होऊ शकलेले नाही. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये अपेक्षित उमेदवार निवडणुकीची तयारी करीत आहेत. मात्र, त्यांच्या नावाची घोषणा होऊ शकलेली नाही.

त्यामुळे उमेदवार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. विशेषतः नाशिक मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे छगन भुजबळ हे उमेदवार म्हणून चर्चेत आहेत.

दुसरीकडे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा या जागेवर दावा आहे. या दोन्ही पक्षांच्या अंतर्गत वादामुळे रोज नवे उमेदवार चर्चेत असतात. या प्रश्नावरून आता कार्यकर्ते अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे.

Chhagan Bhujbal
Shivsena UBT News : शिवसेना ठाकरे गटाचे विजय करंजकर यांचे तिकीट कोणी कापले?

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा दावा असलेल्या सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे यांनी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे असलेल्या सातारा मतदारसंघात भाजपचे खासदार उदयनराजे यांचा दावा आहे.

त्यांनी अनामत रक्कमदेखील भरली आहे. या स्थितीत महायुतीच्या दोन घटक पक्षांच्या जागा भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशिक आणि ठाणे मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाचा दावा प्रबळ असल्याचे बोलले जाते.

या स्थितीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नाशिकची जागा आमच्याकडेच राहील, असा दावा केला आहे. हा दावा भुजबळ यांच्या उमेदवारीचे संकेत देणार आहेत. असे असले तरी जागावाटप आणि उमेदवार दोन्हींची अनिश्चितता दूर झालेली नाही.

नाशिक मतदारसंघात महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. दोन आठवड्यांपासून वाजे प्रचारात सक्रिय आहेत.

त्यामुळे महायुतीच्या उमेदवारीचा घोळ शिवसेना ठाकरे गटाच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत. या गोंधळामुळे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे त्यांच्या समर्थकांनी प्रचार सुरू केला. त्यामुळे महायुतीमध्ये जागा कोणाची आणि उमेदवार कोण यावरून गोंधळ अधिकच वाढत आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

Chhagan Bhujbal
Nashik Loksabha : नाशिकसाठी शिंदे गटाकडून अजय बोरस्तेंना पसंती? उमेदवारीसाठी चुरस

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com