Balasaheb Thorat And Vikhe : बाळासाहेब थोरातांची साद अन् विखे पाटील धावून आले! नेमकं काय झालं ?

Nilvande Dam Water : थोरांताच्या मागणीला मुख्यमंत्र्यांसह विखेंचा प्रतिसाद!!
Balasaheb Thorat,Vikhe Patil
Balasaheb Thorat,Vikhe Patil Sarkarnama
Published on
Updated on

Nagar Latest News : नगर जिल्ह्यातील थोरात-विखे राजकीय द्वंद्व हे राज्यात सर्वश्रुत आहे. एकमेकांची कामे अडवणे, जाहीर उणीदुणी काढणे, राजकीय खेळया असंच काहीसे. मात्र सध्या जायकवाडीला द्यायच्या पाण्यावरून कुठे तरी उत्तरेतील नेते मंडळी एकत्र येताना दिसत असून जिल्ह्यातील पाणी जास्तीतजास्त जिल्ह्यातच पिण्यासाठी आणि सिंचनाला वापरले जावे या प्रयत्नात सर्वजण आहेत. कदाचित त्याचाच एक भाग म्हणून बाळासाहेब थोरातांनी निळवंडे कालव्याचे आवर्तन वाढवले जावे अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री विखे यांच्याकडे केली होती आणि त्याला सरकारने मंजुरी दिली आहे.

निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून सुरू असलेले आवर्तन वाढवून दुष्काळी भागातील जास्तीत जास्त गावांमधील शेतकऱ्यांना पाणी मिळावे अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केल्यानंतर निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे आवर्तन वाढवले असून, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Balasaheb Thorat,Vikhe Patil
Jayakwadi Water Issue : आता विखेंच्या 'पद्मश्री' कारखान्यानेही 'जायकवाडी' प्रश्नी घेतली न्यायालयीन उडी!

निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून सध्या आवर्तन सुरू आहे. यामधून दुष्काळी भागातील अनेक गावांमधील बंधारे भरले जात आहेत. मात्र, दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांची पाण्याची वाढती मागणी यामुळे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारकडे आवर्तन वाढवणे बाबत आग्रही मागणी केली होती.

अनेक अडचणींवर मात करून निळवंडे धरण व कालव्यांची कामे आमदार थोरात यांनी पूर्ण केले. 2022 ऑक्टोबरमध्येच उजव्या व डाव्या कालव्यातून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. याबाबत कोरोना काळातही बैठका घेऊन काम सुरू ठेवले. मात्र सरकार बदलले संपूर्ण काम पूर्ण होते. मात्र फक्त श्रेयवादासाठी उद्घाटन थांबवल्याने आमदार थोरात यांनी मे मध्ये डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी केली होती.

मे महिन्यामध्ये पाण्याची चाचणी घेण्यात आली. सध्या डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू असून उजव्या कालव्याचे काम अपूर्ण असतानाही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा घाट घातला गेला .खरे तर अपूर्ण अवस्थेत पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन करणे अत्यंत चुकीचे आहे, अशी भावना थोरात समर्थकांच्यात असल्याचे बोलले जातेय.

यानंतर डाव्या कालव्यातून आवर्तन सुरू आहे मात्र अनेकांना पाणी मिळाले नसल्याने हे आवर्तन वाढवून मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. यानंतर आमदार थोरात यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , पालकमंत्री यांना पत्र लिहून आवर्तन वाढवणे बाबत मागणी केली. यानंतर डाव्या कालव्याचे आवर्तन वाढवण्यात आले आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावर्षी सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळी जाहीर करावी अशी मागणीही आमदार थोरात यांनी सरकारकडे केली आहे.

Balasaheb Thorat,Vikhe Patil
Radhakrishna Vikhe News : राज्यात भाजपचं नेतृत्व कोण करणार? मंत्री विखेंनी घेतलं 'या' नेत्याचं नाव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com