Radhakrishna Vikhe News : राज्यात भाजपचं नेतृत्व कोण करणार? मंत्री विखेंनी घेतलं 'या' नेत्याचं नाव

BJP PolItical News : देशात लोकसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत...
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील भाजपचा प्रमुख चेहरा मानला जात आहे.महायुती सरकारचे शिल्पकार म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिले जाते.त्यातच कधी ते राष्ट्रीय राजकारणात जाणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे. याचवेळी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाकडून राज्यात नेतृत्व करणार का, यावर ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मोठे भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच मी राज्यात राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नागपूरमधून निवडणूक लढवणार असून राज्याचे नेतृत्व करणार आहे, असे स्पष्ट केले आहे. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी मोठे विधान केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Radhakrishna Vikhe Patil
Shinde Vs Thackeray News : बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी ठाकरे गट - शिंदे गट भिडले; आरोप- प्रत्यारोपांनी वातावरण पेटलं

मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या अध्यक्षतेखाली आज नगर जिल्हा नियोजन मंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावर भाजपकडून राज्याचे नेतृत्व कोण करणार यावर भाष्य केले. देशात लोकसभा निवडणुका येवू घातल्या आहेत. यातच राज्यात भाजप(BJP) महायुतीचे सरकार आहे.

परंतु, राजकीय हालचालींमुळे राज्यात राजकीय अस्थिरता कायम आहे. यातून भाजपचे राज्यातील नेतृत्व कोण करणार यावर नेहमीच चर्चा घडत असते. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केल्यानंतर मंत्री विखे यांनी देखील भाजपच्या पुढील नेतृत्व कोण करणार यावर विधान केले आहे.

मंत्री विखे म्हणाले, "देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यात भाजपचे नेतृत्व केले आहे. राज्याचे ते नेते आहेत. राज्याने त्यांच्या नेतृत्वाखाली गरुडझेप घेत आहे. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि आता उपमुख्यमंत्री पदावर काम करत आहे. राज्याचे ते उपमुख्यमंत्री जरी असले, तरी राज्याच्या विकासाची बहुतांशी धुरा त्यांच्याकडेच आहे. ते निर्णय घ्यायला सक्षम आहेत. पक्ष नेतृत्व देखील त्यांच्या कार्य नेतृत्वाबद्दल जाण आणि कल्पना आहे".

महाविकास आघाडीवर टीका

विरोधकांकडे कोणताच कार्यक्रम शिल्लक राहिलेला नाही. त्यांच्या 'इंडिया'च्या बांधणीचा कार्यक्रम चालू आहे. त्यात देखील काहींचा 'आय' गेला आहे, तर काहींचा 'डी' गेल्याची स्थिती आहे. परंतु गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाच्या नकाशावर सर्वात वेगाने वाढणारी अर्थ व्यवस्था म्हणून देशाला उभारी दिली आहे.

Radhakrishna Vikhe Patil
Jayakwadi Water Issue : पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळवा; विवेक कोल्हेंचा जायकवाडी संघर्षावर पर्याय!

जगभरात पाहिल्यात आज देशातील नागरिकांकडे खर्च करण्याची क्षमता वाढली आहे. राहणीनाम उंचावले आहे. देशातील 80 टक्के जनतेला मोफत धान्य देण्याचा निर्णय संपूर्ण जगात आपल्या देशाने घेतला आहे. हे धाडस जगामध्ये फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आज सगळ्यांच्या जीवनात स्थैर्य आल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी म्हटले आहे.

राजकारणापेक्षा समन्वयाला प्राधान्य

नगर जिल्हा नियोजन समितीच्या आजच्या बैठकीला बहुतांशी आमदार अनुपस्थित होते. यावर मंत्री विखे यांनी भाष्य केले आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक म्हणजे, जिल्ह्याच्या विकास आराखड्याची बैठक असते. सर्व विषय एकमताने येते येतात. त्यावर चर्चा होवून ते एकमताने मंजूर होतात. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कधीही राजकारण येवू दिलेले नाही. आतापर्यंत समन्वयाने काम करण्याची भूमिका आणि पंरपरा राहिलेली आहे. ती सर्वांनी जोपासावी, असे मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Radhakrishna Vikhe Patil
Jayakwadi Water Issue : पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळवा; विवेक कोल्हेंचा जायकवाडी संघर्षावर पर्याय!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com