Balasaheb Thorat Politics: बाळासाहेब थोरातांची शिष्टाई सफल; धुळ्याच्या पाचही मतदारसंघात बंडखोरांची माघार!

Balasaheb Thorat; The rebels of the district including Suhas Naik were persuaded-धुळे जिल्ह्यातील पाचही मतदार संघातील बंडखोरांची समजूत घालण्यात काँग्रेस नेते थोरात यशस्वी
Balasaheb Thorat with Dhule Congress leaders
Balasaheb Thorat with Dhule Congress leadersSarkarnama
Published on
Updated on

Dhude Congress News: धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरी उफाळून आली होती. ही बंडखोरी क्षमविण्यासाठी आज पक्षाचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी धुळ्यात जाऊन यशस्वी प्रयत्न केले.

धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे आहे. या मतदारसंघात पक्षाने दिलेल्या उमेदवारांविरोधात पक्षातील अनेक नेत्यांनी बंडखोरी केली होती. यामध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक हे प्रमुख नेते होते.

या बंडखोरीचा आणि विशेषतः नाईक यांच्या नाराजीचा फटका लगतच्या मतदारसंघावर देखील होण्याची शक्यता होती. त्याचा निवडणुकीवर परिणाम होणार होता. या संदर्भात स्थानिक नेत्यांनी प्रयत्न करूनही बंडखोरांचे मन वळविण्यात त्यांना यश आले नव्हते.

यासंदर्भात प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी पुढाकार घेतला. या संदर्भात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आणि अन्य नेत्यांची संपर्क करण्यात आला होता. त्यानंतर विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी श्रीमती शिंदे यांच्याशी संपर्क करीत बंडखोरांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

Balasaheb Thorat with Dhule Congress leaders
Eknath Shinde Politics: माघारीचे नाट्य; नॉट रिचेबल अहिरराव अडचणीत तर योगेश घोलप यांना दिलासा!

याबाबत अनेक क्लिष्ट विषय असल्याने श्री थोरात आज सकाळी थेट धुळे येथे दाखल झाले. वातावरणात खराब असल्याने त्यांच्या हेलीकॉप्टर उड्डानात अडथळे आले. त्यामुळे हेलिकॉप्टर जाण्यास देखील विलंब झाला. मात्र त्यांनी दुपारी बाराला धुळे येथे जाऊन काँग्रेसच्या नाराज कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांची चर्चा केली.

त्यावर विविध उपाययोजना केल्यानंतर बंडखोरांच्या अर्ज माघारीस सुरुवात झाली. त्यानंतर श्री थोरात यांनी काँग्रेस नेते सुहास नाईक यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी विविध बंडखोरांची चर्चा केली. यावेळी त्यांनी मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री बाला बच्चन यांना देखील बोलवले होते.

यावेळी या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर धुळे जिल्ह्यातील पाचही मतदार संघातील बंडखोरी समविण्यात त्यांना यश आले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास दादा नाईक यांनी शहादा मतदार संघातून माघार घेतल्याने या मतदारसंघातील काँग्रेसची स्थिती सुधारली आहे.

Balasaheb Thorat with Dhule Congress leaders
Congress News: मेळाव्याला 150 लोक आणि माघारीसाठी समजूत काढायला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष!

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोहन शेवाळे आदिवासी संघटनेचे नेते पावरा झेलसिंग तसेच केलसिंग पावरा नंदुरबार येथील तालुकाध्यक्ष विश्वनाथ वळवी, साक्री येथील माजी खासदार डी. एस. अहिरे यांचे चिरंजीव धीरज अहिरे, विजु ठाकरे आदी उमेदवारांनी श्री थोरात यांनी केलेल्या चर्चेनंतर समाधान व्यक्त करीत निवडणुकीतून माघार घेतली.

त्यामुळे धुळे जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवारांचा मार्ग सुपर होण्यास मदत होणार आहे. काँग्रेस पक्षाने धुळे जिल्ह्यात प्रवीण चौरे (साक्री), किरण तडवी (नंदुरबार), राजेंद्र गावित (तळोदा), के. सी. पाडवी (अक्कलकुवा) आणि शिरीष नाईक (नवापूर) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

या संदर्भात काँग्रेस नेत्या प्रतिभाताई शिंदे यांनी धुळे जिल्ह्यातील मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत वरील सर्व नेत्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक यंत्रणा उभी केली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत चांगले यश आले होते. काँग्रेस पक्ष संघटित आणि प्रभावी करण्यासाठी कार्यकर्ते सक्रिय असणे आवश्यक होते.

बंडखोरी झाली असती, तर काँग्रेसच्या उमेदवारांना त्याचा त्रास झाला असता. त्यामुळे याबाबत पक्षाचे विधिमंडळ नेते थोरात यांनी विशेष सहकार्य केले ते स्वतः हेलिकॉप्टरने धुळे येथे आले. त्यांनी सर्व नाराज कार्यकर्ते आणि नेत्यांची समजूत घातली आहे. त्यामुळे धुळ्यातील बंडखोरी समविण्यात यश आले.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com