Congress News: मेळाव्याला 150 लोक आणि माघारीसाठी समजूत काढायला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष!

Maharashtra Election Candidate Withdrawal: उमेदवारी मागे घेण्यासाठी माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी अक्षरशः पक्षाला वेठीस धरले...पत नगरसेवकाची भाव खाल्ला महापौराचा
Vasant Gite & Dr Hemlata Patil
Vasant Gite & Dr Hemlata PatilSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: नाशिक मध्य मतदार संघातून आज विविध प्रमुख उमेदवारांनी माघार घेतली. यामध्ये सर्वाधिक चर्चेची माघार ठरली ती काँग्रेसच्या डॉ हेमलता पाटील यांची. डॉक्टर पाटील यांनी माघार घ्यावी, म्हणून त्यांनी अक्षरश: पक्षाला वेठीस धरल्याचे दिसून आले.

आज नाशिक मध्य मतदार संघातून काँग्रेसचे हनीफ बशीर, माजी नगरसेवक गुलजार कोकणी आणि माजी नगरसेविका डॉ हेमलता पाटील यांनी माघार घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीतील बंडखोरी टळली. मनसेचे अंकुश पवार यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

या माघारीमुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार वसंत गीते यांच्या निवडणुकीचा मार्ग बराचसा बिनधोक झाला आहे. हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळावा म्हणून पक्षीय स्तरावर विशेष प्रयत्न झाले होते. मात्र त्यात पक्षाला यश आले नाही.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हा मतदारसंघ देण्यात आला. हा त्याचे मुख्य कारण काँग्रेस पक्षाकडे सक्षम उमेदवार नाही हे होते. माजी आमदार वसंत गीते यांना शिवसेना ठाकरे पक्षाने उमेदवारी दिली आहे.

Vasant Gite & Dr Hemlata Patil
Chhagan Bhujbal: बंडखोर शिवाजीराव चोथे भुजबळांच्या भेटीला... जरांगे फॅक्टर की अन्य काही?

काँग्रेस पक्षाकडे भाजपच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे आव्हान देऊ शकेल, एवढ्या क्षमतेचा उमेदवार नव्हता. मात्र पक्षातील अनेक स्थानिकांना आपणच उमेदवार आणि प्रबळ असा साक्षात्कार झाला होता. त्यातून गेले आठवड्या भर माघारीचे नाट्य रंगले.

गमतीचा भाग म्हणजे, आज माघार घेण्यासाठी नगण्य क्षमता असलेल्या काही जणांना अवाजवी भाव मिळाला. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांत तो चर्चेचा विषय ठरला. डॉ. पाटील यांच्या माघारीसाठी काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते बी. संदीप यांनी विशेष प्रयत्न केले.

श्री संदीप तसेच उमेदवार माजी आमदार वसंत गीते यांनी बंडखोरीची घोषणा केलेल्या माजी नगरसेविका डॉ पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांसह अनेक पदाधिकारी त्यांना समजावत होते. बंडखोरीसाठी अडून बसलेल्या डॉ पाटील यांना पक्षाच्या निरीक्षकांनी विविध प्रकारे विनंती केली.

Vasant Gite & Dr Hemlata Patil
Mahayuti News : शिंदेंचा माजी आमदार 'नॉट रिचेबल', तर अजितदादांचा उमेदवार शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत

उमेदवारांनीही त्यांना विनंती केली. मात्र त्या बधल्या नाहीत. पक्षाचे महाराष्ट्र संपर्क नेते रमेश चेन्नीथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात शेवटी पक्षाच्या निरीक्षकांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी त्यांची दूरध्वनीवरून संपर्क करून दिला.

त्यानंतर त्यांनी माघारीला मान्यता दिली. मात्र त्यानंतरही अर्धा तास त्या घरातच बसून होत्या. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा अक्षरशा अंत पाहत असल्याचे चित्र दिसले. त्यावर पक्षाच्या कार्यकर्त्यांत मात्र तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

डॉ पाटील यांनी उमेदवारीसाठी एक मेळावा घेतला होता. तो त्यांचे शक्ती प्रदर्शन होते. त्या मेळाव्याला अवघे दिडशे लोक उपस्थित होते. यातील पंचवीस लोक नाशिक पश्चिम मतदारसंघातील होते. विशेष म्हणजे डॉ पाटील यांनी उमेदवारी केली असती, तर त्यांच्याकडे काय यंत्रणा होती? किती कार्यकर्ते होते? हे लपून राहिलेले नाही. मात्र एखाद्या व्यक्तीला माघारीसाठी किती भाव मिळतो, याचे उदाहरण आज नाशिकमध्ये घडले.

क्षमता नगरसेवक पदाची आणि भाव घेतला महापौर पदाचा असाच काहीसा हा प्रकार घडला. त्यामुळे डॉ पाटील या उमेदवार राहिल्या असत्या तरी त्या किती क्षमता आणि मतदान घेऊ शकले असते हा चर्चेचा विषय होता. मात्र आपल्याच पक्षाला किती वेठीस धरावे, हे उदाहरण त्यांनी घडवले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com