Eknath Shinde Politics: माघारीचे नाट्य; नॉट रिचेबल अहिरराव अडचणीत तर योगेश घोलप यांना दिलासा!

Yogesh Gholap; Tanuja Gholap withdraws complaint against Rajshree Ahirrao-शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने याची राजश्री अहिरराव यांच्या विरोधात केली तक्रार, एबी फॉर्म रद्द करण्याची मागणी
Saroj Ahire, Tanuja Gholap & Yogesh Gholap
Saroj Ahire, Tanuja Gholap & Yogesh GholapSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News: देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घटना घडल्या. राजश्री अहिरराव यांना शिवसेना शिंदे पक्षाने दिलेला एबी फॉर्म रद्द करण्याची मागणी आज पक्षाने केली. त्यामुळे राजश्री अहिरराव अडचणीत येऊ शकतात.

देवळाली मतदार संघात आज माजी आमदार योगेश घोलप यांच्या भगिनी आणि भाजपच्या बंडखोर उमेदवार तनुजा घोलप यांनी उमेदवारी मागे घेतली. शिवसेना ठाकरे पक्षाचे संतोष साळवे यांनीही आपले उमेदवारी मागे घेतली आहे. या दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या माघारीने उमेदवारांना दिलासा मिळाला.

याशिवाय रामदास उर्फ बाबा सदाफुले, दिलीप मोरे, प्रकाश दोंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुनील कोथिंबीर यांनी अर्ज मागे घेतला. या माघारीसाठी उमेदवार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना धावपळ करावी लागली.

शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माजी आमदार योगेश घोलप यांना पक्षाच्या नेत्यांनी भगिनी तनुजा घोलप यांची माघार घेण्याबाबत काल सायंकाळी सूचना दिल्या होत्या. त्यानंतर श्री घोलप यांनी तनुजा घोलप यांच्या माघारीसाठी प्रचंड प्रयत्न केले. कौटुंबिक वादामुळे श्रीमती घोलप उमेदवारी मागे घेण्यास तयार नव्हत्या.

Saroj Ahire, Tanuja Gholap & Yogesh Gholap
Congress News: मेळाव्याला 150 लोक आणि माघारीसाठी समजूत काढायला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष!

शेवटी आज सकाळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तयारी दाखवली. मात्र त्यापूर्वी अनेक नाट्यमय घटना घडल्या. त्यात अधिकृत उमेदवारांची दमछाक झाली.

आज घडलेली सर्वाधिक नाट्यमय घटना म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या उमेदवार अहिरराव यांच्याबाबत घडली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांच्यात रविवारी चर्चा झाली. त्या चर्चेनुसार रविवारी सायंकाळी शिवसेना शिंदे पक्षाने दिलेले एबी फॉर्म मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला होता.

या आदेशानंतर काल रात्रीपासूनच शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार नॉट रिचेबल झाले होते. यामध्ये देवळालीच्या राजश्री अहिरराव यांचाही समावेश होता. पक्षाचे माजी खासदार हेमंत गोडसे आणि विजय करंजकर यांनी श्रीमती अहिरराव यांच्याशी संपर्क करण्याचा सातत्याने प्रयत्न केला.

Saroj Ahire, Tanuja Gholap & Yogesh Gholap
Chhagan Bhujbal: बंडखोर शिवाजीराव चोथे भुजबळांच्या भेटीला... जरांगे फॅक्टर की अन्य काही?

सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यावर प्रदेश कार्यालयाने संबंधित एबी फॉर्म रद्द करण्यात यावा, असे पत्र दिले. माजी खासदार गोडसे तसेच श्री.करंजकर यांनी हे पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर केले.

मात्र नियमानुसार पक्ष चिन्ह आणि ए बी फॉर रद्द करण्याबाबतची मुदत 29 ऑक्टोबर होती. त्यामुळे या अर्जाचा कितपत परिणाम होईल हे सांगता येत नाही. या कायदेशीर त्रुटींचा तहसील पदावर काम केलेल्या अहिराव यांनी लाभ मिळविला आहे.

एबी फॉर्म मागे घेण्याचा निर्णय झाल्यावर शिवसेना शिंदे गटाचे बहुतांश उमेदवार नॉट रिचेबल झाले होते. त्यामुळे हे नियोजनपूर्वक करण्यात आले की काय? अशी शंकाही महायुतीच्या काही नेत्यांनी व्यक्त केली होती. श्रीमती अहिरराव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. मात्र पक्षाने त्यांना आपले अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता मागे घेतली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक प्रचारात शिंदे गटाचे किती पदाधिकारी सहभागी होतात. पक्षाकडून श्रीमती अहिरराव यांना बळ मिळते की वाऱ्यावर सोडले जाते, याची आता सगळ्यांना उत्सुकता आहे.

देवळाली विधानसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी त्रासदायक उमेदवारांच्या माघारी घेण्यासाठी उमेदवार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बरीच धावपळ उडाली. या निमित्ताने आता प्रचाराला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. योगेश घोलप यांचा प्रचार आज सायंकाळी पाचला सय्यद पिंपरी येथून सुरू होत आहे. आमदार सरोज अहिरे यांनी यापूर्वीच प्रचार सुरू केला आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com