Congress Lok Sabha Politics: 'बाळासाहेब थोरात यांनी माझे बिन टाक्याचे ऑपरेशन केले'

Balasaheb Thorat : धुळ्यात 'इलेक्शन फीवर' वाढला असतानाच, धुळ्यातील एका कार्यक्रमात पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने भन्नाट किस्सा सांगून, साऱ्यांना पोट धरून हसविले.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarakrnama

Dhule Constituency 2024: काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय खेळ्यांचे खूप सारे किस्से पक्षातील नेतेमंडळी गमतीने सांगतात. धुळ्यात 'इलेक्शन फीवर' वाढला असतानाच, धुळ्यातील एका कार्यक्रमात पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने भन्नाट किस्सा सांगून, साऱ्यांना पोट धरून हसवविले. त्यामुळे कार्यक्रमात रंगत आली आणि हशा पिकला. थोरातांच्या डोळ्यादेखतच हा जिल्हाध्यक्ष जुनी घटना सांगिल्याने बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat यांनाही हसू आवरले नाही.Congress Lok Sabha Politics

धुळे लोकसभा मतदारसंघात Dhule Lok Sabah Election काँग्रेसने डॉ. शोभा बच्छाव Shobha Bacchav यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे इच्छुक व नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी राजीनामा दिला. आता त्यांच्या जागी माजी आमदार शिरीष कोतवाल यांची निवड करण्यात आली आहे.आता त्यांच्या जागी माजी आमदार तुषार शेवाळे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा अध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी आज पदभार स्वीकारला. या वेळी मावळते जिल्हाध्यक्ष डॉ. शेवाळे उपस्थित होते. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या वेळी थोरात यांनी शिरीष कोतवाल यांचे स्वागत केले. मावळत्या अध्यक्ष डॉ. शेवाळे यांच्या कामाचे कौतुकही केले.

Balasaheb Thorat
Vishal Patil News : बापासारखं खासदार व्हावसं वाटतं, ही माझी चूक आहे का? भर सभेत विशाल पाटलांच्या डोळ्यात अश्रू

या वेळी डॉ. शेवाळे यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली. ते म्हणाले, मी सर्जन आहे. भूल देऊन ऑपरेशन करतो. मात्र बाळासाहेब थोरात जे ऑपरेशन करतात ते हसून करतात. न बोलता करतात. असंच त्यांनी माझंही ऑपरेशन केलं आहे. अक्षरश: बिन टाक्याचे ऑपरेशन केले आहे. ही सल आणि ही व्यथा कुठे बोलून दाखवू. आता काय बोलायचे हेच कळत नाही.Congress Lok Sabha Politics

'मी धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 2019 मध्ये उमेदवारी मागितली होती. तेव्हा त्यांनी मला जिल्हाध्यक्ष केलं. यंदाही मी उमेदवारीसाठी इच्छुक होतो. मात्र, मला उमेदवारी मिळाली नाही. त्या नाराजीतून मी पदाचा राजीनामा दिला. मात्र काँग्रेस विचाराशी मी कायम बांधील आहे. काँग्रेस ही एक परंपरा आहे. ती पुढे चालत राहिली पाहिजे. सगळ्यांनी त्यात सहभागी होऊन ही परंपरा पुढे न्यावी,' असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. शेवाळे यांनी अतिशय सूचक शब्दांत आपली नाराजी आणि दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले, मी कोणत्याही राजकीय वारसा नसलेला कार्यकर्ता आहे. माझ्याकडे पैसे नाही. मी काटकसरीने काम केले. मला सगळ्यांनीच सहकार्य केले. साहेबांनी नेहमीच मला मदत केली. मात्र मी देखील तेवढ्याच प्रामाणिकपणे काँग्रेसचे काम केले आहे. माझ्याकडे दोन पैसे कमी असते, पण जनतेच्या मनात स्थान निर्माण केले. साहेबांची आणि इतर नेत्यांची तुलना काय करणार?. कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली, असे सूचक विधान त्यांनी केले.

R

Balasaheb Thorat
Sunetra Pawar : शरद पवार, अजितदादांच्या समर्थकांसाठी 'गुड न्यूज'; पण इलेक्शननंतर...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com