Nashik Graduate Election Result : सत्यजीत तांबेंना थोरातांचा पाठिंबा? पोस्टरमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या

Satyajit Tambe Vs Shubhangi Patil : बॅनरवरील बाळासाहेब थोरातांचे फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत.
Satyajit Tambe
Satyajit Tambe Sarkarnama

Politics : नाशिक पदवीधर निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सध्या या निवडणुकीची मतमोजणी सुरु असून अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे आणि महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) पाठिंबा दिलेल्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यामध्ये जोरदार टक्कर सुरू आहे. मात्र, निकालाआधीच सत्यजीत तांबे यांच्या विजयाचे बॅनर झळकले आहेत.

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील थोरात साखर कारखाना गेट परिसरातील घुलेवाडी या ठिकाणी सत्यजीत तांबे यांच्या विजयाचे निकालाआधीच बॅनर झळकले आहेत. पण या बॅनरवरील बाळासाहेब थोरातांचे फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत. बाळासाहेब थोरातांनी सत्यजीत तांबेंना पाठिंबा दिल्याच्या चर्चेने आता जोर धरला आहे.

Satyajit Tambe
Uddhav Thackeray : ठाकरे गटामध्ये 'फोन टॅपिंग'ची धास्ती? नेत्यांना iPhone वापरण्याच्या सूचना? दानवे म्हणाले...

सुधीर तांबे यांना काँग्रेसने (Congress) अधिकृत उमेदवारी देऊनही त्यांनी अर्ज भरला नाही. त्या ऐवजी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. यामुळे काँग्रेसने सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांना पक्षातून निलंबित केले. मात्र, या सर्व घटनानंतरही थोरातांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

Satyajit Tambe
Eknath Shinde यांचा मोठा गौप्यस्फोट ; गुवाहाटीत असताना 'यांनी' फोनवरुन मला..

तर दुसरीकडे तांबेंच्या विजयी पोस्टरवर थोरात झळकल्याने चर्चेला उधाण आलं आहे. यामुळे अनेक तर्क वितर्क काढण्यात येत असून तांबेंना बाळासाहेब थोरातांनी अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, एका मुलाखतीमध्ये सत्यजीत तांबे यांना तुम्हाला मामांचा पाठिंबा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ते म्हणाले होते की, ''थोरात आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि आम्ही एका परिवारातील आहोत'', असं सूचक त्यांनी केलं होतं.

Satyajit Tambe
Amravati Graduate Result : दुसऱ्या फेरीत लिंगाडेंची आघाडी : रणजीत पाटलांचे टेन्शन वाढले!

या पार्श्वभूमीवरच मागील राजकीय घडामोडी पाहता आणि आज मतमोजणी सुरू असतानाच निकालाच्या आधीच सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांच्या विजयाचे बॅनर झळकले. तसेच या बॅनरवर बाळासाहेब थोरातांचे (Balasaheb Thorat) फोटो झळकल्यामुळे तांबेना थोरातांनी अप्रत्यक्ष पाठिंबा दिला होता का? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com