Eknath Shinde सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. शिवसेनेत फूट पडून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. या सत्तासंघर्षाच्या अनेक रंजक कहाण्या समोर आल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडून ४० आमदार शिंदे गटात सामील झाले. बंडखोर आमदारांनी पहिल्यांदा सुरत नंतर गुवाहाटी गाठलं. या सत्तासंघर्षांबाबत एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी अनेक किस्से सांगितले आहे.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असाच एक गौप्यस्फोट केला. ते आज (गुरुवारी) जालना येथे माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी श्री. श्री. रवीशंकर यांच्याबाबत मोठ विधान केलं आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, "४० आमदारांसोबत गुवाहाटी गेलो होतो तेव्हा मला गुरुदेवांनी (श्री. श्री. रवीशंकर) दूरध्वनीवरुन आशीर्वाद दिला होता. ते म्हणाले, 'चांगले काम करत राहा. अच्छा, सफल व्हा,' गुरुदेवजी चांगले काम करणाऱ्यांच्या पाठिशी उभे राहतात."
गुवाहाटीमध्ये तो 'कार्यक्रम' झाल्यामुळे आता हे 'कार्यक्रम' सुरू आहेत. गुरुदेव आमचे सरकार जे आम्हाला चांगला सल्ला देतील, त्याचा सन्मान करेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
एकनाथ शिंदे म्हणाले..
दाओसमध्ये गुरुदेवांनी आम्हाला आशीर्वाद दिला होता. गेल्या सहा महिन्यांत आमच्या सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. यातला एकही निर्णय वैयक्तिक लाभ देणारा नाही. गणपती, नवरात्रोत्सव, दीपावली सगळे सण आम्ही पुन्हा सुरू केले. एक लाख गावांमध्ये जलतारा प्रकल्प राबवण्याचा श्री श्री रवीशंकर यांचा संकल्प आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.