नाशिकला बंद शांततेत, मालेगाव बंदला तणावाचे गालबोट!

वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ आज मालेगावला बंद पाळण्यात आला.
Bandh in Nashik & Maleagaon
Bandh in Nashik & MaleagaonSarkarnama
Published on
Updated on

मालेगाव : त्रिपुरा येथे अल्पसंख्यांकावरील अन्याय तसेच उत्तर प्रदेशात एका राजकीय नेत्याने वादग्रस्त विधानाचा निषेध म्हणून आज मालेगाव तसेच नाशिक शहरात बंद पुकारण्यात आला होता. नाशिकला बंद शांततेत पार पडला. मात्र मालेगावला काही उत्साही कार्यकर्त्यांमुळे बंदला गालबोट लागले.

Bandh in Nashik & Maleagaon
आयुक्त दीपक पांडेंच्या जिल्हा बँकेतील ‘एन्ट्री’ने बँकेला रडवणाऱ्या राजकीय नेत्यांना फोडला घाम!

यासंदर्भात रझा अकॅडमी व ऑल इंडिया सुन्नी जमेतुल उलेमातर्फे बंद पुकारण्यात आला होता. बंदला शहरात गालबोट लागले. बंदचे आवाहन करणाऱ्या जमावाने सुरवातीला चहा टपरी, हॉटेल व बसस्थानक परिसरात बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी तणाव वाढल्याने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिस व जमाव समोरासमोर आला. जमावातील काही अतीउत्साही कार्यकर्त्यांनी टोकाची भूमिका घेतली. त्यामुळे शहराच्या पुर्व भागात सध्या तणावपुर्ण शांतता आहे.

Bandh in Nashik & Maleagaon
खडसेंनी विरोधकांना खडसावले, `जी चौकशी करायची ती करा, आम्ही तयार आहोत`

यासंदर्भात अपशब्द वापरणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी. अल्पसंख्यांक समाजावरील होणाऱ्या हल्ल्यांवर आळा घालावा. हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज शुक्रवारी बंद पुकारण्यात आला होता. बंदला शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सर्व घटकांनी पाठिंबा दिला होता. शहराच्या पुर्व भागातील रिक्षा, पॉवरलुम, विविध बाजारपेठा, व्यवसाय पुर्णपणे बंद होते. दुध व मेडीकल वगळता बहुतांश व्यावहार बंद होती. या भागात बंद शंभर टक्के यशस्वी झाला.

दरम्यान नाशिक शहरात देखील जुने नाशिक भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. याबाबत पोलिस तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आले. दुपारी निषेध सभा झाली. त्यात दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली.

दरम्यान आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाची आढावा बैठक झाली. त्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. बरणाऱ्या लोकांपासून सावध रहावे. जिल्ह्यात सगळीकडे शांतता आहे, असे सांगितले.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com