Sagar Dhas car crash : नगर-पुणे रोडवरील अपघातात मोठा खुलासा; धसांचाच मुलगा चालवत होता गाडी, 19 तासांपासून पोलिसांच्या ताब्यात

Suresh Dhas Son Sagar Was Driving in Ahilyanagar-Pune Road Accident API Somnath Divate : अहिल्यानगर-पुणे रस्त्यावर पारनेरच्या सुपा शिवारात भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलगा चालवत असलेल्या वाहनांकडून मोठा अपघात झाला आहे.
Sagar Dhas car crash
Sagar Dhas car crashSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Pune road accident : अहिल्यानगर-पुणे रोडवरील जातेगाव शिवार (ता. पारनेर) इथं झालेल्या अपघातात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हा अपघात बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्या वाहनाने झाले आहे. हे वाहन स्वतः सागर चालवत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी दिली.

अहिल्यानगर-पुणे (Pune) रस्त्यावर पारनेरच्या सुपा शिवारात हा अपघात सोमवारी रात्री अकरा वाजता झाला. सुपा पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे. यात नितीन शेळके (वय 34, पळवे खुर्द, ता. पारनेर) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

जातेगाव फाट्यावर झालेल्या अपघाताच्या काही क्षणात आम्हाला माहिती मिळाल्याचा दावा सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी केला. त्यावेळी ते शिरूरवरून येत होते. अपघात होताच, काही क्षणात तिथं अपघातस्थळी पोचल्याचा दावा केला. अपघातानंतर लगेच सागर धस याला ताब्यात घेण्यात आले.

Sagar Dhas car crash
BJP Suresh Dhas son Sagar accident : भाजप आमदार धस यांच्या मुलाच्या वाहनाचा अपघात; धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

अपघातावेळी वाहनात सागर सुरेश धस (Suresh Dhas) (रा. आष्टी, बीड) आणि सचिन दादासाहेब कोकणे (रा. तवलेवाडी, ता. आष्टी. जि.बीड) हे दोघे जण होते. दुचाकीस्वाराला सागर याच्या वाहनाकडून मागून धडक बसली.

Sagar Dhas car crash
BJP MP Kangana Ranaut : राजकारणात सक्रिय कंगनाला पंतप्रधानपदाबाबत काय वाटतं?

सुपा पोलिसांनी सागर धस याच्याकडील वाहन ताब्यात घेतलं असून, वाहनाचा चालकाकडील भागाचे आणि दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. वाहनाची नंबर प्लेट देखील वाकलेली होती. यावरून धडक जोराची असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

सागरला धस नोटिस बजावून सोडणार

अपघातानंतर लगेचच सागर धस याला ताब्यात घेण्यात आलं. सागर धस गेल्या 19 तासांपासून ताब्यात आहे. अपघाताचे नेमकं कारण समोर आलेलं नाही. पण सागर हाच वाहन चालवत होता. त्याला नोटिस बजावून आता सोडले जाणार असल्याचे, सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com