MLA Saroj Ahire : शिंदेंच्या नेत्याला हटवण्यासाठी अजितदादांच्या आमदार पदर खोचून मैदानात, भाजपसह उद्धव सेनेला घेतलंय सोबत

Saroj Ahire Vs Vijay Karanjkar : विजय करंजकर यांची तब्बल २० वर्षांपासून भगूर नगरपालिकेवर सत्ता आहे. परंतु करंजकर यांना सत्तेपासून अलिप्त ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी कंबर कसली आहे.
MLA Saroj Ahire & Vijay Karanjkar
MLA Saroj Ahire & Vijay KaranjkarSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : भगूर नगरपालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेविरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी, भाजप व उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र आलेली असून लक्षवेधी लढत होणार आहे. एकनाथ शिंदे यांचे शिलेदार विजय करंजकर यांची वीस वर्षांपासून नगरपालिकेवर सत्ता आहे. मात्र आता त्यांना सत्तेपासून हटवण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे या पदर खोचून मैदानात उतरल्या आहे.

भगूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद ओबीसी महिला राखीव आहे. करंजकर यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आमदार सरोज अहिरे यांनी भाजप व शिवसेना उबाठा गटाला आपल्यासोबत घेत तीन्ही पक्षांची मोट बांधली आहे. सरोज अहिरे यांनी विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर यांच्या विरोधात येथे राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे यांना उमेदवारी दिली आहे.

प्रेरणा बलकवडे यांना निवडून आणण्यासाठी सरोज अहिरे या जीवाचे रान करत आहे. पहिल्या दिवसापासून त्या प्रचारात उतरलेल्या आहेत. भगूर शहराचा विकास मला वॉटर,मीटर आणि गटर च्या पलिकडे घेऊन जायचा आहे असे म्हणत त्यांनी विजय करंजकर यांना आव्हान दिले आहे. आज प्रचाराच्या शेवटी अजित पवार यांची सभा देखील त्यांनी आयोजित केली आहे.

MLA Saroj Ahire & Vijay Karanjkar
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेचं नुसतं 'लाडकी बहिण', अजित दादांच्या मंत्र्याची सटकली, लय काय काय सुनावलं..

सरोज अहिरे या करंजकर यांची २० वर्षांची सत्ता मोडीत काढायला निघाल्याने भगूरचे वातावरण तापले आहे. करंजकर आणि सरोज अहिरे यांचे संबंध अधिक ताणले गेले आहेत. एका सभेदरम्यान करंजकर यांनी आमदार सरोज अहिरे यांचा बाप काढला. त्याचेच भांडवल आता सरोज अहिरे यांच्या समर्थकांकडून केले जात आहे.

सरोज अहिरे या करंजकर यांची २० वर्षांची सत्ता मोडीत काढायला निघाल्याने भगूरचे वातावरण तापले आहे. करंजकर आणि सरोज अहिरे यांचे संबंध अधिक ताणले गेले आहेत. एका सभेदरम्यान करंजकर यांनी आमदार सरोज अहिरे यांचा बाप काढला. त्याचेच भांडवल आता सरोज अहिरे यांच्या समर्थकांकडून केले जात आहे.

MLA Saroj Ahire & Vijay Karanjkar
Sameer Bhujbal : माझ्या कार्यकर्त्यांवर दमदाटी कराल तर याद राखा, गाठ माझ्याशी..; भरसभेत समीर भुजबळांनी कुणाला दम भरला?

करंजकर यांच्या भाषणाचा व्हिडीओ अहिरे यांच्या समर्थकांकडून व्हायरल केला जात आहे. बापाचा नाद नाही करायचा अशा टॅग लाईन दिल्या जात आहे. करंजकर यांच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल करुन मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी अहिरे यांच्या समर्थकांकडून प्रयत्न होताना दिसत आहे. गावातील समस्या सोशल मीडियावर व्हायरल करुन मांडण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी देवळाली विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार सरोज आहिरे यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांना शिंदे सेनेने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केल्याने वाद निर्माण झाला होता. प्रचंड आरोप-प्रत्यारोप झाले होते. यानंतरही सरोज आहिरे निवडून आल्या होत्या. परंतु त्याचा राग सरोज अहिरे यांना होता. त्यांनी आता प्रेरणा बलकवडे यांच्या निवडीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. बलकवडे- करंजकर पारंपरिक लढतीला आता यानिमित्ताने आणखी एक वादाची किनार मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com