Sameer Bhujbal : माझ्या कार्यकर्त्यांवर दमदाटी कराल तर याद राखा, गाठ माझ्याशी..; भरसभेत समीर भुजबळांनी कुणाला दम भरला?

Yeola Municipal Election : येवला नगरपालिका निवडणुकीची धुरा समीर भुजबळांनी हाती घेतली आहे. समीर भुजबळांनी विरोधकांवर अनेक आरोप केले आहेत. तसेच विरोधकांना सज्जड धम भरला आहे.
Sameer Bhujbal
Sameer BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : येवला हा राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भुजबळ आजारी असून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मात्र तरीही त्यांनी काल हॉस्पिटमधून सलाईन लावलेल्या अवस्थेत येवलेकरांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांचे पुतणे समीर भुजबळ भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

भुजबळ रुग्णालयात असले तरी त्यांचे पुतणे व माजी खासदार समीर भुजबळ हे येवल्यात तळ ठोकून आहेत. येवल्याची सगळी धुरा समीर भुजबळांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. काल, भुजबळांच्या ऑनलाइन भाषणानंतर समीर भुजबळांनी देखील येवलेकरांशी संवाद साधला. येवला शहरातील शनी पटांगणावर समीर भुजबळांची जाहीर सभा झाली. आपल्या भाषणात समीर भुजबळांनी विरोधकांना चांगलाच दम भरला आहे.

समीर भुजबळांनी त्यांचे विरोधक नरेंद्र दराडे व किशोर दराडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. ते म्हणाले की, जे आज आपल्यावर टीका करत आहे. त्यांनी येवल्यातील अनेक बँका आणि पतसंस्था संपविल्या. येवला मर्चंट बँकेला अडचणीत आणले. हे लोक जिथे गेले ती संस्था डूबवतात असा आरोप समीर भुजबळांनी केला.

Sameer Bhujbal
Chhagan Bhujbal : 'सवाल जहर का नहीं था, वो तो मैं पी गया', तकलीफ तब हुई.. हॉस्पिटलमधून भुजबळांचे भावूक करणारे भाषण

जिल्हा बँकेमध्ये गेले जिल्हा बँक बुडाली. २० वर्षांपूर्वी साखर कारखान्याच्या नावाने शेअर्स जमा केले. त्यातून जमीनी घेतल्या, शाळा काढल्या. ज्यांनी पैसे परत मागितले त्यांना दमदाटी केली असा आरोप समीर भुजबळांनी दराडे बंधूंवर नाव न घेता केला.

समीर भुजबळ पुढे म्हणाले, या निवडणुकीत काही प्रभागात गुंडगिरी आणि दमदाटी करण्याचा प्रकार केला जाईल. त्यांना सांगायचे आहे की, माझ्या कार्यकर्त्यांवर कुणीही दमदाटी करण्याचा प्रयत्न जरी केला. तरी याद राखा गाठ माझ्याशी आहे. असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

Sameer Bhujbal
Manikrao Kokate : सिन्नरमध्ये वाजे आणि कोकाटेंमध्ये आधीच मॅच फिक्सिंग? उठलेल्या वावड्यांवर कोकाटेंनी दिलं उत्तर

येवल्यात नगराध्यक्ष पदासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी राजेंद्र लोणारी यांना राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरले असून शिवसेनेकडून आमदार दराडे बंधूंचे पुतणे रूपेश दराडे रिंगणात आहेत. भाजपने राष्ट्रवादीला साथ दिली आहे तर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिल्याने ही निवडणूक अधिकच चुरशीची बनली आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात वातावरण तापलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com