Manikrao Kokate; लहान भावाच्या विजयाने आमदार कोकाटेंना पुन्हा धक्का!

मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत भारत कोकाटे विजयी झाल्याने आमदार कोकाटे गटाची डोकेदुखी वाढणार.
Manikrao Kokate & Bharat Kokate
Manikrao Kokate & Bharat KokateSarkarnama

अजित देसाई

सिन्नर : (Sinner) तालुक्याचे राजकारण हे व्यक्ती केंद्रित आहे. सद्यःस्थितीत आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांच्या भोवतीच सिन्नरचे राजकारण फिरत आहे. नाशिक (Nashik) जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत आमदार कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे (Bharat Kokate) यांनी आमदार समर्थक दिनकर उगले यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला. या पराभवाने मात्र कोकाटे यांच्यातील कौटुंबिक संघर्षाचा फायदा वाजे-सांगळे गटाला झाला आहे. (NCP MLA Manikrao Kokate facing political conflict from there own home)

Manikrao Kokate & Bharat Kokate
Rupali Patil-Thombare : रूपाली पाटलांना आमदारकीचे वेध; शहराध्यक्षांनीच टोचले कान !

आमदार कोकाटेंना त्यांच्या बालेकिल्ल्यात विरोध करण्यासाठी वाजे, सांगळे यांना भारत कोकाटे यांच्या रूपाने मोहरा सापडला आहे. आमदार कोकाटेंच्या गावातच त्यांचा पहिला पराभव भरत कोकाटे यांनी केला. त्यानंतर सोसायटीत आमदारांवर आरोप झाले. आता तालुक्याच्या प्रत्येक निवडणुकीत आमदार कोकाटे यांना घरातूनच शह मिळू लागल्याचे चित्र आहे.

Manikrao Kokate & Bharat Kokate
Pune Municipal Corporation : दिल्लीतून आलेल्या अधिकाऱ्यांनी उडविले पुणे महापालिकेच्या कामाचे धिंडवडे

भारत कोकाटे यांच्याकडून आमदार माणिकराव कोकाटे यांना सातत्याने विरोध सुरू आहे. स्थानिक ग्रामपंचायत, विकास सोसायटीची निवडणूक असो किंवा होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक या सर्वच ठिकाणी भारत कोकाटे यांच्याकडून आमदार कोकाटे व त्यांच्या कन्या सीमंतिनी कोकाटे यांना आव्हान दिले जात आहे. हा कौटुंबिक संघर्ष असला तरी त्याचा थेट परिणाम सिन्नरच्या राजकारणात होत आहे.

भारत कोकाटे यांनी जिल्हा परिषदेच्या देवपूर-शहा गटामध्ये उमेदवारीसाठी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. सोमठाणे ग्रामपंचायत अथवा विकास सोसायटीच्या निवडणुकीत त्यांनी आपले उपद्रवमूल्य दाखवून दिले आहे. आता देखील मजूर फेडरेशनच्या निवडणुकीच्या माध्यमातून आमदार कोकाटे यांच्या गटाकडून दिनकर उगले व विरोधात वाजे-सांगळे गटाकडून भारत कोकाटे अशी दुरंगी लढत बघायला मिळाली. आमदार कोकाटे यांनी स्वतः दिनकर उगले यांच्यासाठी रणनीती तयार केली. त्यामुळे दिनकर उगले सहज निवडून येतील अशी अटकळ असताना भारत कोकाटे यांनी आमदार गटाला सुरुंग लावत दोन मतांनी विजय मिळवला. मजूर फेडरेशनची निवडणूक केवळ आमदार समर्थक उगले यांचा पराभव व भारत कोकाटे यांचा विजय अशी नाही तर सिन्नरच्या राजकारणात वाजे-सांगळे यांच्या गटाला बळ देणारी ठरली आहे.

मतभेदांमुळे दोघे भाऊ आमने-सामने

कुटुंबातील मतभेदांमुळे भारत कोकाटे यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दंड थोपटले. स्वतःच्या मतांवर ठाम राहण्याच्या स्वभावामुळे आमदार कोकाटे यांनी देखील सख्ख्या भावाला राजकीय शुभेच्छा दिल्या. त्यातून सोमठाणे ग्रामपंचायत, सोसायटी निवडणुकीला सत्ता संघर्ष तालुक्याने पाहिला. माजी आमदार राजाभाऊ वाजे व उदय सांगळे यांच्या गटाने देखील कोकाटे यांना राजकीय राजकीय पाठबळ दिले आहे. त्यामुळे भाऊबंदकीचा हा वाद पराकोटीला पोचला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com