Pimpalgao Politics: बनकर कुटुंबियांचा ‘मास्टर स्ट्रोक’; बंधू एकत्र येताच, शिवसेना ठाकरे पक्ष थेट निवडणुकीच्या मैदानाबाहेर?

Bhaskar Bankar joins NCP Ajit Pawar party today, Bankar family coming together is a shock to Uddhav Thackeray's party-पिंपळगाव बसवंत नगरपालिकेचे राजकारण एकाच राजकीय चालीत बदलले, भाजप स्वबळावर तर स्थानिक सगळे विरोधात
Dilip Bankar & Bhaskarrao Bankar
Dilip Bankar & Bhaskarrao BankarSarkarnama
Published on
Updated on

Pimpalgaon Baswant News: निफाडच्या राजकारणात बनकर कुटुंबीयांनी आज मास्टर स्ट्रोक खेळला. आमदार दिलीप बनकर आणि बंधू भास्कर बनकर हे कट्टर विरोधक एकत्र आले. त्यांच्या या निर्णयाने दोघांचेही राजकीय अस्तित्व कायम राहण्याची शक्यता निर्माण झाली.

पिंपळगाव बसवंत नगरपालिका निवडणुकीत गेल्या आठवड्याभरात मोठ्या घडामोडी घडल्या. भास्कर बनकर यांनी मिसळ पार्टी घेतली. आमदार दिलीप बनकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यालयात बैठक घेतली.

यामध्ये दोघांच्याही भारतीय जनता पक्षाशी वाटाघाटी सुरू होत्या. भास्कर बनकर यांनी जागावाटप जवळपास निश्चित केले होते. बनकर यांना सर्वाधिक तेरा जागा मिळाल्याचे कळते. मात्र त्यात नेते समाधानी तर कार्यकर्त्यांचा विरोध अशी स्थिती होती. स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने भास्कर बनकर यांचे राजकारण फिस्कटले.

Dilip Bankar & Bhaskarrao Bankar
Devendra Fadnavis Politics: बळीराजाला दिलासा; कुलूप लागणारी बँक भुजबळ, कोकाटे आणि झिरवाळांमुळे वाचली, मुख्यमंत्र्यांकडून सुमारे ७०० कोटींची मदत!

त्याचा परिणाम म्हणून राजकीय अस्तित्वासाठी नगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत बनकर कुटुंब एकत्र करण्याचा प्रयत्न झाला. आता आमदार बनकर यांचे कट्टर विरोधक भास्कर बनकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे घड्याळ अति बांधणार आहे. या अटीवर दोन्ही अर्थात सर्वच बनकर एकत्र आले आहेत.

Dilip Bankar & Bhaskarrao Bankar
Ahilyanagar municipal election : बोराटे, चव्हाण, त्र्यंबके, गायकवाड, येवलेंना 'दे धक्का'; दिग्गजांची अडचण तर, नवख्यांचा मार्ग मोकळा

नगरपालिका निवडणुकीत आता भाजपासोबत मैदानात उतरणार आहे. गेले काही वर्षात बागायतदार आणि काँग्रेस विचारसरणीचा निफाड बदलतो आहे. पिंपळगाव बसवंत येथे संघ आणि भाजपने आपले बस्तान बसवले आहे. त्याचा सगळ्यात मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे.

भास्कर बनकर हे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल कदम यांचे सहकारी आहेत. मुख्य शिलेदार असलेले भास्कर बनकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. त्यांनी सोबत सर्व यंत्र नाही नेली. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला हा मोठा धक्का आहे. किमान सध्याच्या निवडणुकीत तरी ठाकरे पक्षाला मैदानाबाहेरच राहून निवडणुकीचा खेळ पहावा लागेल.

पिंपळगाव बसवंत येथे बनकर आणि मोरे एकत्र आल्याने तो गेम चेंजर निर्णय ठरणार की त्यांचे राजकारणच अडचणीत येते, ही चर्चा आहे. त्याचा मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांना बसला आहे. ओझर येथेही भाजप स्वबळावर निवडणूक लढणार आहे. या वेगवान राजकीय घडामोडींमुळे विरोधक आणि विशेषता माजी आमदार अनिल कदम यांना मोठा धक्का बसला.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com