Radhakrishna Vikhe Vs Balasaheb Thorat : '40 वर्षांत काहीही केलं नाही, आता अमोलला काम करू द्या'; मंत्री विखेंचा थोरातांवर निशाणा

Bhojapur Dam Water Reaches Sangamner Radhakrishna Vikhe Patil Praises Amol Khatal, Criticizes Balasaheb Thorat : संगमनेरमधील दुष्काळग्रस्त 18 गावांमध्ये तब्बल 40 वर्षांनंतर भोजापूर धरणाचे चारीद्वारे पाणी पोचल्याने ग्रामस्थांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांबरोबर आनंदोत्सव साजरा केला.
Radhakrishna Vikhe Vs Balasaheb Thorat
Radhakrishna Vikhe Vs Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Sangamner politics : भोजापूर चारीला तब्बल 40 वर्षांनंतर पाणी मिळालं. संगमनेर तालुक्यातील तिगाव इथं जलपूजन समारंभ भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थित झाला.

मंत्री विखे पाटलांनी यावेळी काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधत, 40 वर्षांचा हिशोब काढला आणि आमदार अमोल खताळ यांना काम करून द्या, असा सल्ला बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता दिला.

भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) म्हणाले, 'अमोल खताळ नवीन आमदार असल्याने त्याच्यावर सातत्याने टीका होत असते. तुम्ही (बाळासाहेब थोरात) 40 वर्षे काही केले नाही, आता अमोलला तरी काम करू द्या'. संगमनेर मतदारसंघातील लोकांना पूर्वी आमदार बघायला मिळत नव्हते. आता अमोल खताळ गावोगावी फिरतोय, लोकांना भेटतोय, असे मंत्री विखे पाटील यांनी म्हटले.

'अमोल खताळ यांच्या रूपाने झालेले रूपांतर संगमनेर तालुक्याला विकासाची नवी दिशा देणारे ठरणार आहे. 40 वर्षे जनता भोजापूर धरणाच्या पाण्याची वाट बघत होते. भोजापूरच्या लाभक्षेत्रातील गावे वगळावेत यासाठी काँग्रेस (Congress) बाळासाहेब थोरात यांनी पत्र दिले होते', असा गौप्यस्फोट मंत्री विखे पाटलांनी केला.

Radhakrishna Vikhe Vs Balasaheb Thorat
Rohit Pawar Meghana Bordikar : आमदार पवारांनी भाजपची 'दुखती नस' दाबली; मंत्री बोर्डीकर संतापल्याचं कारण वेगळं सांगत कोंडी केली

'लाभक्षेत्रातील गावे वगळ्याचा त्यांना जाब विचारण्याऐवजी तुम्ही आजपर्यंत त्यांनाच निवडून देत होता. आम्ही लाभक्षेत्रातील एकही गाव पाण्यापासून वंचित ठेवणार नाही. पाणी आम्हीच आणले आणि कॅनॉल आम्हीच पूर्ण करणार, असे सांगत जलसंपदा खाते माझ्याकडेच असल्याने तुम्ही चिंता करू नका, कारण मी जे बोलतो ते करतो', असा विश्वास मंत्री विखे पाटलांनी व्यक्त केला.

Radhakrishna Vikhe Vs Balasaheb Thorat
Manoj Jarange Patil : ‘काळजाचा ठोका चुकला!’ लिफ्ट अपघातातून मनोज जरांगे थोडक्यात बचावले, कार्यकर्त्यांमध्ये खळबळ

संगमनेर मतदारसंघातील लोकांना पूर्वी आमदार बघायला मिळत नव्हते. आता अमोल खताळ गावोगावी फिरतोय, लोकांना भेटतोय. पूर्वी संगमनेरमध्ये फक्त क्रेशरवाले आणि वाळूवाले फिरायचे. ठेकेदारांनी गावं वाटून घेतली होती. त्यामुळे आपण आता लोकांमध्ये राहणारा आमदार दिलाय. निश्चिंत राहा, चांगले काम होईल कारण महायुती सरकार आपल्या पाठीशी आहे, असेही मंत्री विखे पाटील म्हटले.

चारीच्या विस्तारीकरणासाठी 30 कोटी

चारीच्या विस्तारीकरणाची मागणी लक्षात घेऊन 30 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्याला लवकरच अंतिम मंजुरी मिळेल. या प्रस्तावांतर्गत पाणी वाहतुकीची कार्यक्षमता वाढविणे, पूर नियंत्रण, तसेच अधिक क्षेत्रास सिंचन सुविधा उपलब्ध होईल. भोजापूर चारीचा समावेश दमणगंगा – वैतरणा – गोदावरी नदीजोड प्रकल्पात करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे 33 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com