
Jalgaon : जळगाव शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी खासदार ईश्वरलाल जैन व त्यांचे पुत्र माजी आमदार मनीष जैन यांच्या मालकीच्या राजमल लखीचंद ज्वेलर्स या सराफा पेढीवर सकाळीच ईडीच्या पथकाने छापा टाकला. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली.
जळगावातील त्यांच्या सुवर्णपेढीसह जळगावातील नेक्सा, मानराज या वाहनांच्या शोरुमवर तसेच निवासस्थानीही हा छापा टाकण्यात आल्याची माहिती आहे. आर्थिक आर.एल. ज्वेलर्सच्या व्यवहारांची धुरा सांभाळणाऱ्या चार्टर्ड अकौन्टंटच्या कार्यालयांमध्येही ईडीच्या पथकांनी सकाळी, एकाचवेळी तपासणी सुरु केल्याचे सांगितले जात आहे.
जळगाव(Jalgaon) शहरातील बालजीपेठेतील ख्यातनाम सराफ पेढी मे.राजमल लखीचंद ज्वेलर्समध्ये आज गुरुवारी (ता.१७) पहाटे परप्रांतीय नंबरप्लेटस् असलेल्या वाहनांचा ताफा धडकला. दहा वाहनांमधून नागपूर व मुंबई येथील सुमारे ४० अधिकारी- कर्मचाऱ्यांचा ताफा आज जळगावात आल्याचे सांगण्यात आले. स्थानिक शनिपेठ पोलिसांना कळवल्याने शनिपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी कारवाईप्रसंगी सुरक्षेसाठी हजर होते.
हा छापा नसून केवळ तपासणी आहे. आणि चौकशीसाठी पथक आले असून माजी आमदार मनीष जैन अधिकाऱ्यांसह पथकाच्या समवेत शोरुममध्ये हजर आहेत. ते संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक दस्तवेजांची माहिती देत असल्याचे सांगण्यात आले.
स्थानिक पोलिसांची मदत
सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने या मोठ्या कारवाईसाठी स्थानिक पोलिसांची मदत घेतली. पोलीस अधिक्षकांसह शनिपेठ पोलिसांना त्याबाबत कल्पना देण्यात आली. त्यानंतर स्थानिक पोलीस दलातील काही अधिकारी- कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ‘ईडी’(ED)चे पथक आर.एल. शोरुमवर धडकले. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरु होती.
मात्र, या कारवाईबद्दल कोणत्याही अधिकाऱ्याने काहीही बोलण्यास नकार दिला. ईश्वरलाल जैन हे राष्ट्रवादी कॉंग्रेस(NCP)चे माजी खासदार आहेत. तर त्यांचे पुत्र मनीष जैन हे माजी आमदार आहेत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे रावेर लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूकही लढवली आहे. मनीष जैन हे सद्या अजित पवार गटात आहेत.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.