Amalner : जळगाव जिल्ह्यातील पारोळा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेने (शिंदे गट)चे आमदार चिमणराव पाटील यांच्या गाडीला रविवारी अपघात झाला. अमळनेर शहराजवळ असलेल्या अंबर्षी महाराज टेकडीजवळ हा अपघात झाला आहे. आमदार पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस सुरक्षारक्षकांच्या पोलीस व्हॅनने त्यांच्या कारला मागून धडक दिली.
चोपडा येथे कामानिमित्त जात असतानाच पारोळा मतदारसंघाचे शिवसेना (Shivsena)आमदार चिमणराव पाटील यांच्या खासगी वाहनाला अपघात झाला. हा अपघात अमळनेर शहराजवळ असलेल्या अंबर्षी महाराज टेकडीजवळ झाली. आमदारांना पुरवण्यात आलेल्या ताफ्यातील पोलीस सुरक्षा वाहनाने आमदारांच्या वाहनाला मागून जोरदार धडक दिली.(Accident)
पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील हे काही कामानिमित्त चोपड्याला गेले होते. चोपड्याहून ते आपल्या वाहनाने (एमएच १९, सीव्ही ५००५) अमळनेर मार्गे पारोळा येथे परत जात असताना सिंधी कॉलनीजवळ असलेल्या गतिरोधकाजवळ त्यांच्या सुरक्षेसाठी असलेली पोलिसांच्या एस्कॉर्ट वाहनाने (एमएच १९, ए ६०१७ ) मागाहून आमदार पाटील यांच्या वाहनाला धडक दिली.
नेमकं काय घडलं..?
आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांची कार समोर होती. त्यांच्या सुरक्षा ताफ्यात पोलीस व्हॅन होती. ही पोलीस व्हॅन मागे होती. पोलीस व्हॅनने मागून आमदार चिमणराव पाटील यांच्या कारला धडक दिली. या धडकेत दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. चिमणराव पाटील हे किरकोळ जखमी झाले.
आमदार पाटील यांनी सीट बेल्ट लावलेला असल्याने सुदैवाने त्यांना काहीच इजा झाली नाही. क्षणभर मात्र त्या धक्क्याने ते भांबावले. त्यांच्या सोबत असलेल्या स्वीय सहाय्यक, अंगरक्षक आणि एकाला जोरात झटका बसल्याने किरकोळ मार लागला. आमदार पाटील यांच्या वाहनाचे मागच्या बाजूने नुकसान झाले. तर पोलिसांच्या गाडीच्या एयरबॅग उघडल्या होत्या. पोलिसांच्या गाडीचे पुढील बंपर तुटले.
दुसऱ्या वाहनाने आमदार पारोळ्याकडे रवाना
आमदार चिमणराव पाटील यांना या अपघातात सुदैवाने गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, पोलीस व्हॅन आणि त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झाले आहे. यावेळी आमदारांच्या वाहनात वाहनचालक, आमदार चिमणराव पाटील, त्यांचे स्वीय सहाय्यक तर पोलिसांच्या वाहनात ३ ते ४ पोलीस कर्मचारी होते. मोठा अनर्थ टळल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं. अपघातानंतर दुसऱ्या वाहनाने आमदार पाटील हे पारोळ्याकडे रवाना झाले.
त्याचवेळी मागाहून येणाऱ्या बाजार समितीचे माजी संचालक पराग पाटील यांनी आमदार चिमणराव पाटील यांना स्वतःच्या वाहनाने घरी सोडले. आमदार पाटील यांच्याशी संपर्क साधला असता आपण सुखरूप असून मोठा अनर्थ टळल्याचे त्यांनी सांगितले.
यात दोन्ही गाड्यांचे नुकसान
या अपघातात आमदार चिमणराव पाटील यांच्या कारला पोलीस व्हॅनने पाठीमागून धडक दिली. यात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. शिवाय आमदार चिमणराव पाटील हे सुद्धा जखमी झाले आहेत.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.