Nana Patole On Prakash Ambedkar: 'वंचित'च्या 'इंडिया आघाडी'तील एन्ट्रीबाबत नाना पटोलेंचं मोठं विधान

Congress : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज शिर्डीत बोलत होते.
Nana Patole and Prakash Ambedkar
Nana Patole and Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: "वंचित बहुजन आघाडीने आपला प्रस्ताव आमच्याकडे द्यावा, त्यांच्याकडून आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. कुठलीही चर्चा प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर झालेली नाही", असा पुनरुच्चार काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपण 1 सप्टेंबर 2023 ला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे हाती (बायहँड), मेलवर प्रस्ताव पाठवल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, तरीही पटोले यांनी आज ठामपणे आमच्याकडे प्रकाश आंबेडकरांकडून कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचे सांगितले आहे.

Nana Patole and Prakash Ambedkar
Bacchu Kadu on Anil Deshmukh : आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्याने पहिले आपले थोबाड पाहावे !

आज शिर्डी इथे आलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आंबेडकरांच्या स्पष्टीकरणाबाबत विचारले असता प्रस्ताव आला नसल्याचा पुनरुच्चार केला. या वेळी पटोले यांनी प्रकाश आंबेडकर हे महान नेते आहेत. अशा नेत्याबरोबर काँग्रेस वायफळ चर्चा करायला तयार नसल्याचे सांगितले.

काँग्रेसची लगाम काँग्रेसच्या हातात आहे. एकीकडे देश वाचवण्यासाठी आम्हाला सोबत घ्या म्हणायचे आणि दुसरीकडे आम्हाला इंडिया आघाडीत घेतले नसल्याचे सांगायचे, असे बोलून काँग्रेसला बदनाम करून देश खाईत टाखण्याचे काम चालेले आहे का ? या प्रश्नाचे उत्तर आंबेडकर यांनी द्यावे, असा खोचक प्रश्न विचारला.

प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच इंडिया आघाडीतील समावेशाबाबत काँग्रेसचे राज्यातील नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांचा समाचार घेताना, 'वंचित'कडून एक सप्टेंबरलाच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे प्रस्ताव दिल्याचे स्पष्ट केलं होतं.

याबाबत अधिक बोलताना त्यांनी असंही म्हटलं होतं की, राज्यातील ज्या नेत्यांना अधिकार नाही किंवा ज्यांना सीरियसली त्यांचाच पक्ष घेत नाही अशांकडून माध्यमांमध्ये वक्तव्य येत आहेत. आंबेडकरांचे हे खोचक वक्तव्य पटोलेंबाबत असल्याचे बोलले जातेय.

Nana Patole and Prakash Ambedkar
Kolhapur Crime News : लाखांच्या लाचेने साखरेंचा गोडवा संपवला; कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

या पार्श्वभूमीवर आज शिर्डीमध्ये पटोले यांना आंबेडकर यांच्या इंडिया आघाडीतील समावेशाबाबत प्रस्ताव दिल्याच्या दाव्यावर छेडले असता पटोले यांनी आंबेडकर यांच्याकडून कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचा पुनरुच्चार केला. तसेच प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेला एक प्रकारे दुटप्पीपणा असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.

Edited By- Ganesh Thombare

Nana Patole and Prakash Ambedkar
Gram Panchayat Election: ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; ऐन दिवाळीत उडणार धुरळा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com