Bacchu Kadu on Anil Deshmukh : आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्याने पहिले आपले थोबाड पाहावे !

Akola : आमदाराचे उपचार ज्या पद्धतीने होतात, त्याच प्रमाणे मतदान करणाऱ्याचे का होत नाहीत?
Bacchu Kadu and Anil Deshmukh
Bacchu Kadu and Anil DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Akola Political News : नांदेडमध्ये २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाला. या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान, माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया देत एखाद्या आमदाराचे ज्यापद्धतीने उपचार होतात. त्यापद्धतीने मत देणाऱ्याचे उपचार का होत नाही, असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे. (The government should take action against the guilty officers)

आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा मागणे ही राजकिय मागणी आहे. व्यवस्था निर्माण केली पाहिजे. मात्र, ज्याने राजीनामा मागितला त्यांच्या काळात काय सुविधा होती? त्यामुळे राजीनामा मागणाऱ्याने आपले थोबाड पाहावे, असेही बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू आज (ता. तीन) अकोल्यात आले असता माध्यमांशी बोलत होते.

नांदेड येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या अक्षम्य दुर्लक्षाप्रकरणी सरकारने दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई तर करावीच. पण आरोग्य विभागाचे प्रमुख म्हणून आरोग्यमंत्र्यांना प्रथम मंत्रिमंडळातून नारळ द्यावा, अशी मागणी माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी `X’ च्या माध्यमातून केली होती. त्यांच्या मागणीचा बच्चू कडू यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. २) समोर आली अन् राज्यभरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर पुढच्या २४ तासांत पुन्हा सात जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. यामध्ये चार बालकांचादेखील समावेश असल्याची माहिती आहे. यावर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, माजी राज्यमंत्री बच्चू यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

बच्चू कडू म्हणाले, या देशामध्ये जाती-धर्माचे प्रश्न राजकीय लोकांनी आपल्या फायद्यासाठी मोठे केले. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे झाली. मात्र, अद्यापही आरोग्याचा प्रश्न कायम आहे. शिक्षणसंबंधी प्रश्न कायम आहेत. घर, शेती यांचेही प्रश्न कायम आहेत. प्रत्येक जाती, धर्मांत शेतकरी आहेत. त्यामुळे एका शेतकऱ्याचे प्रश्न मिटले असते तर आज आरक्षणाच्या मागण्या झाल्या नसत्या.

आज एखाद्या आमदाराला चांगले उपचार मिळतात. पण मत देणाऱ्याला का चांगले उपचार मिळत नाही. येथे भोंग्याचे प्रश्न मोठे का होतात, असा सवालही बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. तर आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्यांनी पहिले स्वतःचे थोबाड पाहावे. त्यांनी स्वतः त्यांच्या काळात काय केले, ते पाहावे. त्यांनी राजीनामा मागून राजकारण करू नये, असेही बच्चू कडू म्हणाले. शेतकऱ्याला आर्थिक आरक्षण देण्याची मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.

Edited By : Atul Mehere

Bacchu Kadu and Anil Deshmukh
Bacchu Kadu News : दिव्यांग मेळाव्याकडे पाठ फिरवणाऱ्या लोकप्रतिनिधींची बच्चू कडूंनी केली पाठराखण !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com