Pankaja Munde Dasara Melava : सुजय विखे भाषणाला उभे राहताच पंकजा मुंडे पुढे आल्या; डोक्यावरील पंचा काढताच जल्लोष! (Video)

Pankaja Munde removed towel from Sujay Vikhe Patil head during Bhagwan Bhakti Gad Dasara Melava, drawing cheers crowd. : उन्हाच्या तडाख्यात भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा; विखे पाटील भाषणासाठी उभे राहताच पंकजा मुंडेंची कृती चर्चेत, सुजय विखेंनाही आवरले नाही हसू.
Pankaja Munde Sujay Vikhe
Pankaja Munde Sujay VikheSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pankaja Munde Dasara Melava 2026 : भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांचा भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा झाला. या मेळाव्याला भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी हजेरी लावली.

विखे पाटील भाषण करत असतानाच, मंत्री मुंडे पुढे येत, त्यांच्याबरोबर केलेली कृती चर्चेत आली आहे. विखे पाटील यांनी उन्हामुळे डोक्यावर पांढऱ्या रंगाचा पंचा गुंडाळला होता. तो पंचा काढून घेत, विखे पाटील यांचे डोके मंत्री मुंडे यांनी मोकळे केले.

महाराष्ट्रात (Maharashtra) यंदा दुष्काळ आहे. त्या पार्श्वभूमीवर 'आपला दसरा, आपली परंपरा', असे म्हणत पंकजा मुंडे यांचा मेळावा कसा होतो, याकडे लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात हा 12 वा मेळावा होत आहे. मंत्री मेघना बोपर्डीकर, माजी मंत्री धनंजय मुंडे, महादेव जानकर, आमदार मोनिका राजळे, माजी खासदार प्रीतम मुंडे आदी उपस्थित होते.

यंदा एल नीनोच्या प्रभावामुळे प्रचंड ऊन आहे. अशाही दसरा, अन् राजकीय परंपरेनुसार दसरा मेळावे होत आहे. मनोज जरांगे पाटील यांचा नारायण गडावर मेळावा होत असतानाच, इकडे भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा मेळावा सुरू झाला होता. उन्हाचा पारा जवळपास 45 ते 46 अंश सेल्सिअसपर्यंत होता. सूर्य आग ओकत असल्याने अनेकांनी उन्हापासून रक्षण व्हावे, यासाठी डोक्याला पंचे गुंडाळले होते. यात व्यासपीठावर बसलेले माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील डोक्याला पांढऱ्या रंगाचा पंचा गुंडाळला होता.

Pankaja Munde Sujay Vikhe
Ahilyanagar DCC Bank Election : जिल्हा बँकेसाठी थोरात-लंके एकत्र येईनात? राम शिंदेंच्या हालचालींनी वाढवली उत्सुकता

माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्या भाषणानंतर, माजी खासदार सुजय विखे पाटील भाषणाला उभे राहिले. तेव्हा त्यांच्या डोक्यावर हा पांढर्‍या रंगाचा पंचा तसाच होता. भगवानबाबांना नतमस्तक होऊन विखे पाटील आपल्या भाषणाला सुरवात करणार तेवढ्यात मागे बसलेल्या पंकजा मुंडे उठून त्यांच्या जवळ आल्या. त्यांनी त्यांच्या डोक्यावर गुंडाळलेला पंचा काढून घेतला. पंकजा मुंडे यांनी मेळाव्यासमोर असलेल्या श्रोत्यांना हात करताच, एकच जल्लोष झाला. विखे पाटील यांच्या डोक्यावरचा पंचा मुंडे घेऊन गेल्या. पंकजा मुंडे यांनी केलेल्या या कृतीने सुजय विखे पाटील यांना देखील हसू आवरता आले नाही.

Pankaja Munde Sujay Vikhe
Ahilyanagar DCC Bank Election : राम शिंदे पुन्हा गडाखांच्या भेटीला; अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काय घडणार?

सुजय विखे पाटील म्हणाले, "आजचा मेळावा अभूतपूर्व असा आहे. सालाबादप्रमाणे आपण येतोच. या रखरखत्या उन्हात मेळाव्यासाठी 50 हजारांपेक्षा जास्त लोकं आली आहे. हे फक्त मुंडे साहेबांचे प्रेमच करू शकते. महाराष्ट्रात एवढ्या ऊनात कोणीही अशी सभा अन् मेळावा घेऊ शकत नाही. पंकजा मुंडे यांची हीच ताकद आहे की, एवढ्या मोठ्याप्रमाणात त्यांना आशीर्वाद मिळतो."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com