Ahilyanagar DCC Bank Election : राम शिंदे पुन्हा गडाखांच्या भेटीला; अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काय घडणार?

Ram Shinde meets Yashwantrao Gadakh political talks intensify ahead Ahilyanagar District Bank election withdrawal deadline : अर्ज माघारीसाठी अवघे दोन दिवस; बिनविरोध निवडणुकीच्या शक्यतेवर राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींमुळे चर्चा.
Ram Shinde meets Yashwantrao Gadakh
Ram Shinde meets Yashwantrao GadakhSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ahilyanagar District Bank Election : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्यासाठी अवघे दोन दिवस राहिले आहेत. तत्पूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या भेटीसाठी आज जात आहे.

यातच अहिल्यानगर शहरात भाजप पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील दौऱ्यावर आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात देखील अहिल्यानगर शहरात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राम शिंदे यशवंतराव गडाख यांची भेट घेत असल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नेमकी कोणती उलथापालथ होते, याकडे लक्ष लागले आहे.

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (DDC Bank) अर्ज माघारी घेण्यासाठी अंतिम मुदत 22 तारखेपर्यंत आहे. गेल्या दहा दिवसांत निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. खासदार नीलेश लंके यांनी नाराजांना बरोबर घेऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर राम शिंदे अन् खासदार लंकेंची अहिल्यानगरच्या शासकीय विश्रामगृहावर बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेवेळी एकनाथ शिंदे शिवसेनेचे माजी आमदार भानुदास मुरकुटे देखील उपस्थित होते.

राम शिंदे (Ram Shinde) यांनी खासदार लंकेंबरोबर झालेल्या या बैठकीनंतर, बँकेची निवडणूक बिनविरोधासाठी कोणीतरी अडसर आणत आहेत, असे सूचकपणे म्हटले होते. खासदार लंकेंनी देखील पॅनलबाबत थांबा आणि पाहा, असे म्हणत, बिनविरोधचा विषय संपल्याचे म्हटले होते. गेल्या काही दिवसांपासून खासदार लंके महायुती आणि महाविकास आघाडातील नाराज पदाधिकाऱ्यांच्या घेरावात आहेत.

Ram Shinde meets Yashwantrao Gadakh
Ahilyanagar DCC Bank Election : लोकसभेपासून असलेली थोरातांची साथ सुटली? जिल्हा बँकेत लंकेंची वेगळी वाट? राम शिंदेंसोबतच्या बैठकीने चर्चेला उधाण

राम शिंदे यांनी यावेळी बिनविरोधचे पहिल्यादांचा ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केलेल्या आवाहनाकडे लक्ष वेधले होते. त्यांनीच आता पुढाकार घ्यावा, असे सांगितले होते. निवडणुकीची तयारी करताना राम शिंदे यांनी यशवंतराव गडाख यांची भेट घेतली होती. आता पुन्हा बिनविरोधच्या फिस्कटताना दिसत असतानाच, राम शिंदे यशवंतराव गडाखांच्या भेटीला जात आहेत. त्यामुळे या भेटीत काय घडते, याकडे लक्ष लागले आहे.

Ram Shinde meets Yashwantrao Gadakh
Ahilyanagar DCC Bank Election : राम शिंदेंचा मंत्री विखे पाटलांना अप्रत्यक्ष टोला; जिल्हा बँकेच्या बिनविरोधावरून नवा पेच?

दरम्यान, मंत्री विखे पाटील देखील आज अहिल्यानगर शहरात आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात देखील आज शहरात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे दुपारनंतर जिल्हा बँकेच्या अनुषंगाने मोठे अपडेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बाळासाहेब थोरात आणि सुजय विखे पाटील यांची यशवंतराव गडाख यांच्या सोनई येथील आमराईत भेट झाली होती. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही काही दिवसांपूर्वी झालेली भेट आजही चर्चेत आहेत. राम शिंदे यांनी देखील सुरूवातीला गडाखांची भेट घेतली होती. त्यानंतर विखे पाटील पिता-पुत्रांनी देखील गडाखांच्या भेटीला गेले होते. या गाठीभेटीतून जिल्हा बँकेच्या निवडणूक बिनविरोधाचे गणित यशस्वी होणार का? याच प्रश्नाचे उत्तर येत्या दोन दिवसांत मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com