Akhilesh Yadav : अखिलेश यादव नाशिकच्या शेतकऱ्यांचा 'हा' प्रयोग नेणार उत्तर प्रदेशला

Akhilesh Yadav : नाशिकच्या कांदा आणि द्राक्षांची गोडी सबंध देशभर प्रसिद्ध आहे. आता उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री खासदार अखिलेश यादव यांनाही त्याची भुरळ पडल्याचं पाहायला मिळालं.
Akhilesh Yadav, Nahsik Farmer
Akhilesh Yadav, Nahsik FarmerSarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 27 June : नाशिकच्या कांदा आणि द्राक्षांची गोडी सबंध देशभर प्रसिद्ध आहे. आता उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री खासदार अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनाही त्याची भुरळ पडल्याचं दिसत आहे.

सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शिरीष कोतवाल यांनी संसदेच्या आवारात अखिलेश यादव यांच्याशी चर्चा केली. यावेळी खासदार यादव यांनी नाशिकच्या वाईन वरायटीच्या द्राक्षांविषयी आवर्जून माहिती घेतली. ते पाहण्यासाठी आपण नाशिकला येऊ असंही ते यावेळी म्हणाले.

यावेळी अखिलेश यादव (Akhilesh Yadav) म्हणाले, "नाशिकच्या शेतकऱ्यांनी वाईनच्या द्राक्षांची निर्मिती करून एक चांगला प्रयोग केला आहे. त्याला सर्व दूर प्रसिद्धी मिळत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनाही वाईनची द्राक्ष कशी पिकवली जातात याविषयी मोठी उत्सुकता आहे.

Akhilesh Yadav, Nahsik Farmer
Maharashtra Politics : मोठी बातमी! राज्य सरकारची नजर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांवर, विधानसभेपूर्वी हालचालींना वेग

वाइनरीचा प्रयोग उत्तर प्रदेशात गेल्यास उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना एका नव्या पिकाची माहिती मिळेल. यातील अनेक शेतकरी वाईन व्हरायटीच्या द्राक्षांबाबत उत्सुक आहेत. त्याची लागवड केल्यास वाइनरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची भरभराट होऊ शकेल. या माध्यमातून युवकांना रोजगार देखील मिळेल. त्यामुळे या संदर्भात गेले काही दिवस आम्ही माहिती घेत असून यासाठी माझा नाशिकला (Nashik) येण्याचा प्रयत्न आहे."

Akhilesh Yadav, Nahsik Farmer
Sanjay Singh: आपचे खासदार संजय सिंह तब्बल वर्षभरानंतर संसदेत जाणार; उपराष्ट्रपतींचे मानले आभार!

यावेळी कोतवाल यांनी सांगितलं, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीने आणि इंडिया आघाडीने मिळवलेल्या यशाबद्दल अखिलेश यादव यांचे अभिनंदन केले. शिवाय त्यांना नाशिकला येण्याचे निमंत्रण देखील दिले. यानिमित्ताने नाशिक आणि उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांमध्ये एक वेगळा संबंध निर्माण होण्याची चिन्हं आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com