तिकीट कापलेले भाजप खासदार ए. टी. पाटील घेणार कार्यकर्त्यांचा कौल

भारतीय जनता पक्षाचे दोन वेळा खासदार राहिलेले ए. टी. पाटील यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दिवसापासून अज्ञातवासात असलेले खासदार ए. टी. पाटील रात्री उशीरा पारोळा येथे त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमली होती. 'नानासाहेब तुम आगेबढो, हम तुम्हारे साथ है!' अशा घोषणा अनेक कार्यकर्त्यांनी दिल्या.
तिकीट कापलेले भाजप खासदार ए. टी. पाटील घेणार कार्यकर्त्यांचा कौल
Published on
Updated on

जळगाव : होय, उमेदवारी मलाच मिळायला हवी होती, मला उमेदवारी नाकारली गेली, पक्षाचा निर्णय झाला आहे. पण मला भेटायला कार्यकर्ते येत आहेत, त्यामुळे आपण मेळाव्यात कार्यकर्त्यांचा निर्णय घेवून पुढील नियोजन करणार आहोत, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे तिकीट नाकारलेले खासदार ए.टी.पाटील यांनी 'सरकारनामाशी'बोलतांना केले.

भारतीय जनता पक्षाचे दोन वेळा खासदार राहिलेले ए. टी. पाटील यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दिवसापासून अज्ञातवासात असलेले खासदार ए. टी. पाटील रात्री उशीरा पारोळा येथे त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमली होती. 'नानासाहेब तुम आगेबढो, हम तुम्हारे साथ है!' अशा घोषणा अनेक कार्यकर्त्यांनी दिल्या. पुढे काय करायचे, अशी विचारणाही कार्यकर्त्यांनी केली. त्यावेळी खासदार पाटील यांनी त्यांना काही काळ वाट पाहण्याचा सल्लाही दिला.

स्मिता वाघ यांची भेट
भारतीय जनता पक्षाच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवारी आमदार स्मिता वाघ यांनी रात्री पारोळा येथे खासदार ए. टी. पाटील यांची भेट घेतली. व त्यांना सहकार्य करण्याचे आवाहनही केले.खासदार ए. टी. पाटील यांनीही या भेटीला दुजोरा दिला. स्मिता वाघांची पारोळा येथे खासदार पाटील यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या, त्यावेळी पाटील समर्थकानी "नानासाहेब आगे बढो..हम तुम्हारे साथ है''च्या घोषणा दिल्या.

पक्षादेश पाळा खडसेंचा आदेश
पारोळा येथे खासदार पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाल्यानंतर काही समर्थक रातोरात मुक्ताईनगरकडे रवाना झाले, त्यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेतली. गेले दहा वर्षे खासदारकीचे काम चांगल्या पध्दतीने करणाऱ्या ए. टी. पाटील यांच्यावर अन्याय झाला आहे. अद्यापही वेळ गेलेली नाही, यासंदर्भात आपण काही तरी करावे अशी विनवणीही पाटील समर्थकांनी केली. त्यावेळी खडसे यांनी पक्षाचा निर्णय आहे, त्यामुळे पक्षादेश पाळावाच लागेल, असेही सांगितले असल्याचे भेट घेतलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

मेळाव्यात घेणार कौल : खासदार पाटील
खासदार ए.टी.पाटील यांच्याशी 'सरकारनामा'ने संपर्क साधला असता, ते म्हणाले, "आपण उमेदवारीसाठी पक्षाकडे मागणी केली होती, संसदेतील आपल्या कामाचा अहवालाही चांगला आहे, त्यामुळे आपण मुख्य दावेदार होतो, परंतु, पक्षाने आपल्याला उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. आपण कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहोत. त्यात पुढे काय करायचे याबाबत कार्यकर्त्यांचा कौल घेणार आहोत. त्या प्रमाणे आपण पत्रकार परिषद घेवून जाहीर करणार आहोत."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com