Nandurbar APMC news : भाजपला विरोधकांचे नव्हे एकनाथ शिंदे गटाचेच तगडे आव्हान!

बाजार समित्यांच्या निवडणुकीत भाजपचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना शिंदे गटाचे चंद्रकांत रघुवंशी यांनी दिले थेट आव्हान!
Chandrakant Raghuwanshi & Dr. Vijaykumar Gavit
Chandrakant Raghuwanshi & Dr. Vijaykumar GavitSarkarnama

Vijaykumar Gavit News : नंदुरबारसह जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणुका प्रक्रीया सुरू आहे. यंदा इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. यामध्ये राजकीय वर्चस्व प्रस्थापित केलेल्या भाजपचे मंत्री विजयकुमार गावित यांना विरोधकांचे नव्हे तर चक्क शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. (APMC election in between BJP & Eknath Shinde Group)

येत्या २० एप्रिलला माघारीच्या अंतिम दिवशी घडणाऱ्या घडामोडींनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुका नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील निवडणुका अटीतटीच्या होतील, अशी चिन्हे आहेत. त्यात भाजपचे (BJP) नेते डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) आणि शिवसेनेचे (Shivsena) चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuwanshi) यांच्यातच चित्र रंगणार आहे.

Chandrakant Raghuwanshi & Dr. Vijaykumar Gavit
Dhule APMC news : काँग्रेसच्या कुणाल पाटील यांच्यापुढे भाजप नेत्यांची सत्वपरीक्षा

दरम्यान, या निवडणुका जिल्ह्यात राजकीय नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या ठरत असल्याने राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावून निवडणुक जिंकण्याचा चंग बांधला आहे. विशेषतः नंदुरबार बाजार समिती सर्वात प्रतिष्ठेची ठरणार आहे.

बाजार समित्यांवरील आतापर्यंतच्या राजकीय वर्चस्वाचा विचार केल्यास नंदुरबार बाजार समितीवर मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी पाच वर्ष सत्ता प्रस्थापित करून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा वर्चस्वाला धक्का दिला होता. मात्र, त्यानंतर श्री. रघुवंशी यांनी पुन्हा बाजार समिती आपल्या ताब्यात घेतली. सध्याही त्यांचेच वर्चस्व आहे.

Chandrakant Raghuwanshi & Dr. Vijaykumar Gavit
Shivsena news : शंभर युवा नेत्यांचा उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश!

यंदाच्या निवडणुकीतही भाजपचे नेते तथा मंत्री डॉ. गावित व शिवसेनेते नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटात चुरशीची लढत रंगणार आहे. दोन्हीही नेत्यांचे राज्यपातळीवर वर्चस्व असल्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणुक राजकीय प्रतिष्ठेची ठरणार आहे. नंदुरबार बाजार समितीत भाजपचे युवा नेते डॉ. विक्रांत मोरे स्वतः निवडणुक रिंगणात आहेत. त्यामुळे अधिकच प्रतिष्ठेची ठरणार आहे.

शहाद्यातील क्लिष्ट चित्र

दरम्यान, शहादा बाजार समितीवर दीपक पाटील गटाचे आतापर्यंत एकतर्फी वर्चस्व होते. मात्र, सध्या अभिजित पाटील यांनीही उमेदवार दिले आहेत. महाविकास आघाडीही निवडणुक रिंगणात आहे. मंत्री डॉ. गावित यांच्या नेतृत्वाखाली हेमलता शितोळे यांनीही वेगळा गट उभा केला आहे. विशेष म्हणजे दीपक पाटील हे भाजपमध्ये असताना त्यांच्याच पक्षाचा दुसरा गट निवडणुक रिंगणात आहे. त्यामुळे शहाद्यात क्लिष्ट चित्र निर्माण झाले आहे.

Chandrakant Raghuwanshi & Dr. Vijaykumar Gavit
Chandrashekhar Bavankule News : खडसे आमच्यासाठी आजही आदरणीयच आहेत!

नवापूर बाजार समितीवर कॉंग्रेसचे एकतर्फी वर्चस्व होते. आता माणिकराव गावित यांचे पुत्र भाजपमध्ये आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचे आमदार शिरीषकुमार नाईक व भाजपचे नेते भरत गावित यांच्या गटात चुरशीची लढत होणार आहे. या बाजार समितीवरील आतापर्यंत असलेले कॉंग्रेसचे वर्चस्व शाबूत राहते, की भाजपचे भरत गावित यांचे वर्चस्व सिद्ध होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण हे दोन्ही नेते यापूर्वी एकत्र होते. त्यामुळे दोघांचे वर्चस्व होते. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. डोकारे साखर कारखाना निवडणुकीत आमदार नाईक गटाला धक्का देत भरत गावित यांनी वर्चस्व सिद्ध केले आहे. कारखाना ताब्यात घेतला आहे. तसेच चित्र बाजार समितीतही निर्माण होऊ शकते. त्यामुळे दोन माजी मित्रांच्या गटांमध्येच जोरदार लढत होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com